फलटण : कोल्हापूर येथील कोरोना बाधित निष्पन्न झालेली महिला गिरवी, ता. फलटण येथे 20 ते 22 मार्च दरम्यान नातेवाईकाच्या निधनाच्या निमित्ताने वास्तव्यास होती. तसेच बनवडी, ता. कोरेगाव येथेही तिचे वास्तव्य होते. कोल्हापुरातील ती महिला कोरोना बाधित असल्याचे कोल्हापूर जिल्हाधिकार्यांनी जिल्हा प्रशासनाला कळविल्यानंतर गिरवीतील त्या नातेवाईकांना तत्काळ फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले असून कोरोना सदृश्य लक्षणे त्यांच्यामध्ये आढळल्यानंतर त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात येणार आहेत.
गिरवी, ता. फलटण येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या व्यक्तीची जवळची नातेवाईक असणारी कोल्हापुरातील एक महिला गिरवी येथे आली होती. 20 ते 22 मार्च या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये तिचे वास्तव्य गिरवी येथे होते. त्यानंतर ती महिला गिरवी येथून बनवडी, ता. कोरेगाव येथील नातेवाईकांकडे गेली होती. कालच कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका महिलेचे सातारा जिल्ह्यात वास्तव्य असल्याचे कळविले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्या महिलेच्या प्रवासाचा इतिहास तपासला. यानंतर तिचे वास्तव्य फलटण येथील गिरवी व कोरेगाव तालुक्यातील बनवडी येथे झाले असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, काल त्या महिलेचे गिरवी कनेक्शन समोर आल्यानंतर प्रशासनाने तत्काळ गिरवीत धाव घेत त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या 13 नातेवाईकांना फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात तत्काळ क्वारंटाईन केलेले आहे, तर बनवडी ता. कोरेगाव येथील तिच्या संपर्कात आलेल्या 8 नातेवाईकांनाही कराड येथील कृष्णा मेडिकलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, गिरवी येथील 13 लोकांना उद्या सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्या कोरोना बाधित महिलेचे गिरवीमध्ये दोन दिवसाचे वास्तव्य असल्यामुळे गिरवीसह फलटण तालुक्यात खळबळ उडाली असून संपूर्ण गिरवीमध्ये पोलिसांनी कालपासूनच संचार व जमावबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |