सातारा : शुक्रवारी रात्री सातार्यातील पेढ्याचा भैरोबा येथे अपार्टमेंटवर झालेल्या दगडफेक, तलवारी नाचवून राडा केल्याप्रकरणी एकाच टोळीवर दरोड्यासह एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहे. या राड्यात तिघेजन जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, शनिवारी दुसर्या दिवशीही परिसरात तणावाचे वातावरण राहिले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.
रोहित जाधव, रोहन जाधव व त्यांचे पाच ते सहा साथीदार यांच्यावर दरोडा, गर्दी करुन मारामारी, तलवारीसारख्या धारदार शस्त्रे नाचवणे याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सातारा तालुका व शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
अनिकेत त्रिंबक वेल्हाळ (वय 24, रा.चैतन्य कॉलनी, शाहूपुरी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दरोड्याप्रकरणी तक्रार दिली आहे. या घटनेत ते स्वत: जखमी झालेले आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास धुमाळ आळी, सातारा येथून दुचाकीवरुन तक्रारदार निघाला होता. यावेळी संशयित टोळक्याने जाड दोरखंडाने डोक्यात मारुन जखमी केले. यानंतर लाकडी दांडक्यानेही मारहाण करुन तक्रारदार यांची एम एच 12 एचएम 7267 ही दुचाकी जबरदस्तीने ताब्यात घेतली. यावेळी संशयितंानी शिवीगाळ करुन दमदाटीही केली. या सर्व प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.
दुसरी तक्रार राहूल उमाकांत भोंडे (वय 25, रा.स्वरांजली अपार्टमेंट, शाहूपुरी) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात मारहाण, तोडफोड व धारदार शस्त्रे नाचवल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. संशयित टोळके सायंकाळी स्वराांजली अपार्टमेंट खाली आले. संशयितांनी तक्रारदार यांच्या घरात घुसून तक्रारदारासह त्याच्या कुटुंबातील वडील, आई यांना मारहाण केली. यावेळी संशयितांनी तलवार, लाकडी दांडकी नाचवत धुडगूस घातला. संशयितांनी अपार्टमेंटमधील इतर रहिवाशांच्या घराच्या काचा फोडल्याने अख्ख अपार्टमेंट भितीच्या छायेखाली गेले.
संशयितांनी तक्रारदार यांना मारहाण केल्यानंतर तेथून जाताना दुचाकी वाहनांची तोडफोड करुन दमदाटी, शिवीगाळ केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे परिसर तणावाखाली होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर रात्री उशीरापर्यंत व शनिवारी दिवसभरही त्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |