नवी दिल्ली : घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत चालू महिन्यात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. या सिलिंडरच्या किंमतीत शुक्रवारी दोन रुपयांची वाढ घोषित करण्यात आली. एलपीजी पुरवठादारांना (डीलर्स) देण्यात येणाऱ्या कमिशनमध्ये दोन रुपयांची वाढ झाल्याने सिलिंडरची किंमतही त्याच प्रमाणात वाढली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत १४.२ किलो वजनाचा घरगुती सिलिंडर ५०५.०५ रुपयांना मिळेल.
यापूर्वी नोव्हेंबरमध्ये या सिलिंडरच्या किंमतीत २.९४ रुपयांची वाढ करण्यात आली होती. कर पुनर्रचनेमुळे ही वाढ झाली होती. यानंतर आता पुरवठादारांचे कमिशन वाढविण्यात आल्याने सिलिंडरची किंमत आणखी वाढली आहे. 'सिलिंडर पुरवठादारांचे कमिशन सप्टेंबर २०१७नंतर वाढविण्यात आले नव्हते. सिलिंडरची ने-आण करण्याच्या खर्चांत झालेली वाढ, वाढते पगार आदी मुद्द्यांचा विचार करून ही प्रलंबित मागणी पूर्ण करण्यात आली आहे. यानुसार १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरमागे प्रत्येकी ५०.५८ रुपये तर, पाच किलो वजनाच्या सिलिंडरमागे २५.२९ रुपये कमिशन दिले जाईल,' असे पेट्रोलियम मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
विनाअनुदानित आणखी महाग
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील गॅसशी सुसंगत राखावी लागते. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसची किंमत वाढल्याने विनाअनुदानित गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. विनाअनुदानित गॅसच्या किंमतीत एक नोव्हेंबरला ६० रुपयांची वाढ झाली होती. आता पुरवठादारांचे कमिशन वाढल्यानंतर मुंबईत या सिलिंडरची किंमत ९४२.५० रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसची किंमत वाढल्यानंतर अनुदानित सिलिंडरवरील अनुदान सरकारकडून वाढवले जाऊन त्यांची किंमत स्थिर ठेवली जाते.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |