07:01pm | Mar 24, 2018 |
सातारा : सातारा शहरात राजघराण्याशिवाय पान हलत नाही, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारु शकत नाही. परंतू सध्या भाजपने शहरात चांगल्या पद्धतीने मुसंडी मारली आहे. तब्बल सहा नगरसेवक भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आले आहेत. ही निष्ठावंतांची जनकमाई आहे. तिचा आदर राखण्यासाठी सातारा नगरपालिकेत भाजपच्या निष्ठावंतांना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान, भाजपच्याच चिन्हावर इतर पक्षातील आयाराम गयारामांना संधी देण्याच्या हालचाली दिसू लागल्यामुळे निष्ठावंतांच्या फळीमध्ये नाराजी पसरली आहे. ही नाराजी पक्षश्रेष्ठी नक्कीच दूर करतील, असा विश्वास गेली चाळीस वर्षे जनसंघापासून काम करणारे भाजप निष्ठावंत व्यक्त करीत आहेत.
याबाबत माहिती अशी की, सातारा शहरात यापूर्वी दोन प्रबळ रेल्वे इंजिन होते. या इंजिनाच्या आधारे अनेक पक्षांचे डबे जोडून नगरपालिकेचा कारभार हाकला जात होता. काही वेळेस पक्षातील दोन गटातच लढती होत होत्या. या सर्व गोष्टीला वैतागलेल्या सातारकरांनी चमत्कार दाखवून दिला. प्रथमच भाजपने नगरपालिकेत षटकार मारला. यापूर्वी भाजपने जनतेच्या प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलन केले. एवढेच नव्हेतर सध्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना पदवीधर मतदारसंघातून सातारा शहरात जास्तीतजास्त मतदान व्हावे यासाठी तत्कालीन भाजप जिल्हा युवा अध्यक्ष व सध्याचे सातारा शहर भाजप अध्यक्ष सुनील काळेकर यांनी मोलाची भूमिका बजावली होती. सध्या पक्षविस्तारक म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी 134 गावांना भेटी दिल्या आहेत. सातारा नगरपालिका वेळेवर कचरा उचलत नाही म्हणून नगराध्यक्ष व मुख्याधिकार्यांच्या दालनात कचरा फेकण्यात आला होता. या आंदोलनाचे सातारकरांनी कौतुक केले होते. त्याचवेळी भाजपचे कमळ उगविण्यासाठी चिखल तयार झाला.
सध्या भाजपच्या विकासकामांमुळे एकेकाळी सातारा जिल्ह्यात विशेषत: जातीयवादी पक्ष अशी हेटाळणी करणारे आता गळ्यात भाजपचा पंचा अडकवितात, याचा सातार्यातील ज्येष्ठ भाजप नेत्यांना अभिमान वाटत आहे. पक्ष वाढताना संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीसाठी भाजपचे निष्ठावंत प्रयत्नशील आहेत. सध्या भाजपचे स्विकृत नगरसेवक ऍड. प्रशांत खामकर यांनी राजिनामा दिला असून याठिकाणी भाजपमध्ये चालून संधी आली आहे. सध्या सर्व जातीधर्माचे लोक भाजपकडे आकर्षित झाले आहेत. सातारा शहरात मोठ्या संख्येने मागासवर्गीय व इतर मागासवर्गीयांची संख्या आहे. ते भाजपसोबत काम करीत असल्यामुळे त्यांना संधी मिळावी, अशी जोरदार मागणी मित्रपक्षाकडूनही होत आहे. कारण, सातारा नगरपालिकेत भाजपचे कमळ असले तरी घड्याळाकडे बघून प्रश्न मांडणार्या काही हितचिंतकांनी भाजप वाढविण्यापेक्षा आपल्या मनातील नेत्याला खूष करण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे निष्ठावंतांना संधी देताना शहराध्यक्ष यांनी मटक्याविरोधात लढा दिला. त्यामुळे काही नाराज मंडळी त्याचे राजकारण करीत आहेत. परंतू माननिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनिल काळेकर यांना संरक्षण देवून आपण कार्यकर्त्याच्या पाठिशी आहे, हे दाखवून दिले आहे. स्विकृत नगरसेवकपदी सुनिल काळेकर, शहाजी माळी, महेंद्र कदम, अप्पा कोरे यांची नावे सध्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप निष्ठावंतांनी यश संपादन केल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |