RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

कराड विमानतळ विस्तारीकरणातील बांधीतांना नोटीस

07 August 2018 at 21:18

नागरिकात भितीचे वातावरण : २८ खातेदारांचा समावेश

कराड : कराड विमानतळ विस्तारवाढीला प्रशासनाने गती दिली आहे. वारूंजी येथील २८ बाधीत खातेदारांना उपविभागीय कार्यालयाने नोटीस बजावली आहे. आपल्या मालकची घरे, गोठे, वर्कशॉप आदींच्या पुर्नबांधणीसाठी निधी मंजूर झाला आहे. त्याअनुषंगे चर्चा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बैठकीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कराड विमानतळ विस्तार वाढीचा निर्णय आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता. त्यानुसार प्रकल्पासाठी निधीचीही तरतुद करण्यात आली होती. मात्र कराड विमानतळ विस्तार वाढीत बाधीत होणारे शेतकरी, रहिवाशी नागरिक यांच्यासह  वारूंजी, मुंढे, केसे, पाडळी, सुपने गावातील ३२०० एकर बागायत जमीन क्षेत्रासाठी संजीवनी ठरलेली भैरवनाथ पाणी पुरवठा संस्था बाधीत होत आहे. त्यामुळे सर्व बाधीतांनी एकत्रित येत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कराड विमानतळ विस्तार वाढ विरोधी कृती समिती स्थापन करून मोठा लढा उभा केला आहे.

लोकशाही पध्दतीने विविध मोर्चे, आंदोलने करत बागायत क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत विमानतळ विस्तार वाढ होऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे. २००७ च्या भुसपांदन अधिनियमानुसार बागायत क्षेत्रात प्रकल्प उभारता येणार नाही. याबाबत प्रशासनाबरोबर अनेक वेळा चर्चा केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी शामगाव येथील उपजाऊ नसणारी जमीन सुचवण्यात आली आहे. वारूंजी येथील शेतकऱ्यांनी स्वत:चा विकास स्वत: केला आहे. तसेच हा प्रकल्प शामगावला केल्यास या विभागाचा मोठा विकास होणार असल्याचे कृती समितीने पुराव्यानिशी प्रशासनाला दाखवून दिले आहे.

असे असताना प्रशासनाने कोणतीही पूर्व सुचना न देता कच्ची मोजणी करत असल्याची दिशाभूल करत कायम मोजणी केल्याचे रेकॉर्ड रंगवले आहे. येथील बाधीत शेतकऱ्यांच्या साताबारा उताऱ्यावर मोजणी झाल्याचे दाखवून पुनर्वसनाचे शिक्के मारले आहेत. तर या प्रकल्पात २८ शेतकरी खातेदारांना नोटीस बजावून विमानतळ विकास संपादनाच्या क्षेत्रात असणारी मालकीची घरे, गोटे, वर्कशॉप आदी बाबी संयुक्तीक मोजणी नकाशानुसार दिसून येत आहेत. त्यामुळे प्रकल्पात बाधीत खातेदारांच्या मागणीनुसार व संपादन मंडळाच्या मान्यतेनुसार बाधीतांना पुर्नबांधणीसाठी शासनाने पुर्नपॅकेज मंजूर केले आहे. त्यानुसार मिळणाऱ्या सवलतीबाबत चर्चा करण्यासाठी येथील तहसील कार्यालयात दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आपल्या नोंदीची कागदपत्रे घेऊन हजर राहण्याची  नोटीस बजावली आहे. या बैठकीला जे खातेदार उपस्थित राहणार नाहीत त्यांचे याबाबत कोणतेही म्हणणे नाही, असे समजून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे नोटीसीमध्ये स्पष्ट केले आहे.

ही नोटीस धनंजय सकट, किसन आडागळे, मंजुळा पवार, सतीश आरे, विलास देसाई, उत्तम पवार, मुमताज तांबोळी, चांदबी सैय्यद, सुनिता चव्हाण, रणजित सोळंखी, हिरालाल राठोड, रूक्साना शेख, चंद्रकात माळी, गफार नदाफ, धर्माजी जाधव, उषा साळुंखे, संत निरंकारी मंडळ, वसंत यादव, मुमताजबी शेख, मोहन साळुंखे, रघुनाथ थोरात, शांताराम चव्हाण, आसिफ शेख, अल्ताफ शेख, फिरोज नदाफ, मालन साळंखे, पदमाबाई जाधव व पं. स. सदस्य नामदेव पाटील या २८ खातेदारांना देण्यात आली आहे.

 

नोटीस ३ ऑगस्टची हातात ७ ऑगस्टला

कराड विमानतळ विस्तारवाढ हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने प्रशासन याबाबत प्रचंड गोपनियता ठेवली आहे. याचा प्रत्यय नुकताच आला. बाधीत खातेदारांना दि. ३ ऑगस्ट तारीख असणारी नोटीस दि. ७ ऑगस्ट रोजी बाधीत खातेदारांना दिली. तर दि. १० ऑगस्ट रोजी सर्व नोंदीची कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे बजावण्यात आले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात सर्व कागदपत्रे घेऊन बाधीतांना उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाला हा विषय रेटायचाच आहे, हे स्पष्ट होत आहे.
एटीएमची माहिती घेवून डॉक्टरची फसवणूक

सातार्‍यातील डॉ. विवेक रामचंद्र भोसले (वय 45, रा.मतकर कॉलनी, शाहूपुरी) यांना अज्ञाताने फोन करुन एटीएम ब्लॉक झाल्याचे खोटे सांगून माहिती घेवून फसवणूक केली.

14 hours before

सातार्‍यात गळफास घेवून एकाची आत्महत्या

येथील जुना आरटीओ चौकात असणार्‍या भाड्याच्या खोलीत गळफास घेवून सोमवारी दुपारी युवराज कैलास चव्हाण (वय 33, मुळ रा. कोर्टी, ता. करमाळा, सोलापूर) यांनी आत्महत्या केली.

14 hours before

सेव्हन स्टार परिसरात जुगार अड्ड्यावर छापा

जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सेव्हन स्टार बिल्डींग परिसरात जुगार खेळणार्‍या तिघांवर कारवाई करुन पोलिसांनी 5 हजार 655 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.

14 hours before

आगरकर पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

टेंभू (ता.कराड) येथे कै.गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुतळ्याची शुक्रवारी दि. 18 रोजी मध्रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली होती. या समाजकंटकांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार

14 hours before