सातारा : प्रतापसिंहनगर, सातारा येथील दत्तात्रय रामचंद्र जाधव याच्यासह त्याच्या टोळीवर सातारा शहरातील शेतजमिनीचा विषय मिटवून घेण्यासाठी 16 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम तथा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने ही कारवाई करण्यात आल्यानंतर सातार्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.
दत्ता जाधव, चंद्रकांत विष्णू सावंत, मंगेश चंद्रकांत सावंत (तिघे रा.सातारा) व इतर 8 ते 10 अनोळखीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात ग्रे रंगाची इनोव्हा 302 या कारचा वापर झाला असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राजकुमार जाधव (रा.पुसेगाव) हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. तक्रारदार यांचा मेहुणा सर्जेराव दत्तू माने यांची सातारा येथील वनवासवाडी व संगमनगर येथे वडीलोपार्जित 5 एकर शेतजमीन आहे. या शेतजमीनीच्या वाटपाबाबत तक्रारदार यांचा भाचा हरिश्चंद्र सर्जेराव माने यांनी सातारा येथे दिवाणी न्यायालयात एक दावा दाखल केला आहे.
तक्रारदार राजकुमार जाधव यांचे मेहुणे सर्जेराव माने व त्यांच्या दोन बहिणी यांच्या नावावरील एकूण 75 गुंठे क्षेत्र संशयित आरोपी चंद्रकांत सावंत याने तक्रारदार यांचे मेहुणे सर्जेराव माने व त्यांच्या बहिणींच्या सह्या फसवून घेवून गिताबाई झवंर, जयंत गोविंद ठक्कर (रा.सातारा) यांच्या नावाने कुलमुखत्यारपत्र झालेले आहे. शेतजमिनीच्या या विषयावरुन न्यायालयात दावा सुरु असून सर्जेराव माने यांना केसमधील काही समजत नसल्याने फिर्यादी राजकुमार जाधव व त्यांचा भाचा हरिश्चंद्र माने हे काम पाहत आहेत.
सातार्यातील याच शेतजमिनीच्या विषयावरुन ऑक्टोबर 2017 मध्ये दुपारी संशयित आरोपी मंगेश सावंत याने तक्रारदार राजकुमार जाधव यांच्या पुसेगाव येथील घरात घुसून जागेच्या कारणातून शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेनंतर सुमारे 12 ते 13 दिवसांनी दुपारी संशयित आरोपी दत्ता जाधव, चंद्रकांत सावंत, मंगेश सावंत व इतर अनोळखी 8 ते 10 जण 302 या स्कॉर्पिओसह इतर अनोळखी वाहनातून पुसेगाव येथे आले होते. तक्रारदार राजकुमार जाधव यांना संशयितांनी सिध्दनाथ पतसंस्थेजवळ सेवागिरी ट्रेडर्स दुकानासमोर बोलावून घेतले. ‘सातार्यातील शेतजमिनीचे सुरु असलेले कोर्टमॅटर मिटवून घेण्यासाठी तक्रारदार यांना 16 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकीही संशयितांनी दिली’
याबाबतची तक्रार पुसेगाव पोलिस ठाण्यात दाखल आहे.
पुसेगाव पोलिस ठाण्याला दाखल असलेल्या गुन्ह्यातील टोळी चालक दत्ता जाधव व त्याच्या टोळीतील इतर सहकार्यांनी कोर्टमॅटर मिटवण्यासाठी पैसे मागून ते पैसे न दिल्याने घरात घुसून स्वत:च्या टोळीच्या फायद्याकरीता तक्रारदार यांना जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पुसेगाव पोलिस ठाणेचे सपोनि एस.ए.गायकवाड यांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे पुसेगाव पोलिसांनी दत्ता जाधव याच्या टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. संबंधित हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला असता त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दत्ता जाधव याच्यावरील या मोक्काचा पुढील तपास कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे या करणार आहेत.
सातारा पोलिसांनी दत्ता जाधव याला लावलेल्या मोक्का संदर्भात प्रसिध्दीपत्र काढले आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, दत्ता जाधव व त्याच्या टोळीतील साथीदारांच्या अनधिकृत जमिनी, फ्लॅट, बंगलो, प्लॉट, टू-व्हिलर, चारचाकी, स्थावर, जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी या टोळीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती असल्यास पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |