लंडन : लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची जागा घेतील. ब्रक्झिटनंतर थेरेसा मे यांनी 7 जून रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, जॉन्सन हे पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशा शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आल्या होत्या.
ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी आणि सत्तारूढ कंझर्वेटीव्ह पार्टीच्या नेतेपदासाठी सोमवारी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये पक्षाच्या 1 लाख 60 हजार कार्यकर्त्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. मतदान प्रक्रियेदरम्यान, जॉन्सन हे आघाडीवर होते. ब्रिटनच्या संविधानानुसार बहुमत असलेल्या पक्षाचा नेताच पंतप्रधानपदी विराजमान होतो. दरम्यान, थेरेसा मे सरकारमधील परराष्ट्र मंत्री अॅलन डंकन यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच जॉन्सन यांच्यासोबत आपण काम करू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.
बोरिस जॉन्सन ब्रेक्झिटचे खंदे समर्थक आहेत. यासाठी त्यांनी अभियानदेखील राबवलं होतं. जॉन्सन यांची पक्षनेतेपदी निवड झाल्यानं सध्या पंतप्रधानपद भूषवत असलेल्या थेरेसा मे त्यांचा राजीनामा राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे सोपवतील. त्याआधी त्या संसदेत पंतप्रधान म्हणून प्रश्नांचा सामना करतील. ब्रेक्झिटसाठी मतदान झाल्यानंतर डेव्हिड कॅमेरुन यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर थेरेसा मे यांनी देशाचं नेतृत्त्व केलं.
ब्रिटनच्या जनतेनं तीन वर्षांपूर्वी ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल दिला. मात्र अद्यापही याबद्दलची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आव्हान जॉन्सन यांच्यासमोर असेल. विशेष म्हणजे जॉन्सन यांच्या पक्षातील परिस्थितीदेखील त्यांच्यासाठी फारशी अनुकूल नाही. जॉन्सन यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यापेक्षा आम्ही राजीनामा देऊ, अशी भूमिका चॅन्सलर फिलिप हेमंड यांच्यासह अनेक प्रमुख कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |