कराड : कराड शहर प्लास्टीकमुक्त करण्याचा निर्धार करत कराड नगरपालिका विजय दिवस समारोह समितीने कराड शहरातुन काढलेल्या प्लास्टिक मुक्त कराड दौडला कराडकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
भारतीय सैन्यदलाने बांग्लामुक्तीसाठी केलेल्या विजयी कामगिरीच्या पार्श्वभुमीवर निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय दिवस समारोहाचे येथे दरवर्षी साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणुन दरवर्षी घेण्यात येणार्या कराड दौडला यंदा प्लॅस्टीकमुक्तीची जोड देण्यात आली. पालिका आणि विजय दिवस समारोह समितीच्यावतीने कराड शहरातुन आज सकाळी प्लॅस्टीकमुक्त कर्हाडच्या दौड काढण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या येथील दत्त चौकात आज सकाळी आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवल्यानंतर दौडला प्रारंभ झाला.
विजय दिवस समारोह समितीचे प्रमुख कर्नल पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, प्रा. जालिंदर काशीद, ऍड. संभाजीराव मोहिते, विनायक विभुते यांच्यासह समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. दौडीत विद्यार्थ्यांसह, शहरातील नागरिक व नगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. दौड दत्त चौकातून आझाद चौक, नेहरू चौक, चावडी चौकामार्गे मुख्य रस्त्यावरून कन्या शाळेसमोरुन कृष्णा नाक्यावरुन उपजिल्हा रुग्णालयासमोरुन विजय दिवस चौकापर्यंत नेण्यात आली. तेथुन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला नेण्यात आली. तिथे स्वच्छतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |