कराड : मराठी भाषा टिकेल का? असा प्रश्नच मुळी चुकीचा आहे. प्राचीन परंपरा लाभलेली ही भाषा नवीन बदल पचवून अधिक वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन महिला महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रा.विलास सुर्वे यांनी केले. शिक्षण मंडळाच्या टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
मराठी भाषेची थोरवी सांगताना प्रा. सुर्वे यांनी संत परंपरा, पंडिती काव्य व आधुनिक साहित्याचा आढावा घेऊन कुसुमाग्रजांचे योगदान स्पष्ट केले. यावेळी भित्तीपत्रक व हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले . याप्रसंगी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषेतील नियतकालिकांचे प्रदर्शन आयोजित केले होते. प्रदर्शनाचे उदघाटन शिक्षण मंडळ कराडचे सहसचिव राजेंद्र लाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. कराडमध्ये वाचन संस्कृती राबविणारे अरुण काकडे यांचीही उपस्थिती होती.
कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. अरुण काकडे यांनी मराठी सारस्वतांचे रोचक किस्से सांगितले.
प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.संदीप जोशी यांनी केले. प्राचार्य गोकुळ आहिरे , उपप्राचार्य अशोक आटकर, पर्यवेक्षक धनाजीराव देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक ,विद्यार्थिनी याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.अनुराधा जाधव यांनी केले व आभार प्रा.सौ.ज्योती पाटील यांनी मानले.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |