02:51pm | Apr 15, 2018 |
सातारा : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत असून सौभाग्य योजनेतून दलित वस्तीत १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. या अभियानाची राज्यात शनिवारपासून सुरूवात झाली असून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व अधीक्षक अभियंत्यानी क्षेत्रीय स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे शनिवारी दिले.
या अभियानात राज्यातील १९२ गावांत सौभाग्य योजनेतून वीजजोडणी देण्यात येणार आहे. त्यात फलटण तालुक्यातील सोनगावच्या दलित वस्तीत १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. अधीक्षक अभियंता (संचालन व सुव्यवस्था) यांच्यावर ही जबाबदारी टाकून त्यांनी त्यांच्या मंडलाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी संबंधित विभागाचे प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता यांना दिले. यासाठी स्थानिक पातळीवरील जनमित्र, तंत्रज्ञ यांच्या मदतीने वीजजोडणी नसलेल्यांची आकडेवारी घेऊन ती तपासून त्यांना वीजजोडणी तात्काळ देण्यात यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
ज्या खेडी, पाडे, वाडी व वस्तीतील ग्राहकांना महावितरणच्या पायाभूत सुविधेतून वीजजोडणी देता येत नाही अशा ग्राहकांची यादी तयार करून त्यांना अपारंपरिक पद्धतीने सौर ऊर्जेची वीजजोडणी देण्यात यावी. तसेच त्याप्रमाणे कृती कार्यक्रम तयार करून १९२ गावात तातडीने वीजजोडणी देण्यासाठी ५ मे २०१८ ची वाट न बघता ३० एप्रिल २०१८ पर्यंत ही कामे पूर्ण करण्यासही यावेळी सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 'प्रधानमंत्री हर घर बिजली योजना' अर्थात 'सौभाग्य' योजनेत प्रत्येक कुटुंबांपर्यंत वीज पोहचविण्याचे धोरण असून ग्रामीण व शहरी भागातील वीज नसलेल्या प्रत्येक घरात वीजजोडणी देण्यात येणार आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |