03:49am | Jan 28, 2020 |
कराड : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा आपल्या अचूकतेमुळे नेहमीच ‘धर्मकाटा’ म्हणून ओळखला जातो. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी केली. त्यावेळी भरारी पथकाच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी प्रत्येकवेळी कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे कृष्णाच्या वजनकाट्याने ‘धर्मकाटा’ ही ओळख अबाधित राखली आहे.
सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी काढले आहेत. यानुसार कराडचे नायब तहसीलदार व्हि.आर.माने, कराड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड, शेणोलीचे मंडल अधिकारी जे.बी.बोडके, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साजीद मुल्ला, शेतकरी संघटना सैदापूरचे अध्यक्ष विश्वास जाधव, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष अशोक लोहार, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष सुनिल कोळी, लेखा परिक्षक एस.आर.फरांदे, वैद्यमापनशास्त्र विभागाचे निरिक्षक ल. उ. कुटेे यांनी संयुक्तपणे कारखाना कार्यस्थळाला भेट देऊन तपासणी केली. यावेळी 20 किलो क्षमतेच्या वजनाने तपासणी करण्यात आली. तसेच ऊसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे निदर्शनास आल्याने कृष्णा कारखान्याचा वजनकाटा निर्दोष व अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला. यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, चिफ इंजीनीअर सुहास घोरपडे, स्टोअर किपर जी. बी. मोहिते, सिनीअर इंजीनीअर ए. डी. पाटील, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे आदी उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |