"यह है दौरे-हवस, लेकीन ऐसा भी क्या, आदमी काम से कम आदमी तो रहे, ही उर्दू शायरी आहे, विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांची, अहो आठवलं ना ?, कैसर खालीद तेच ते, की ज्यांच्या कारने सातार्यातील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी एका वृद्धाला धडक दिली होती. या धडकेत जखमी झालेला त्या वृद्धाचा नंतर मृत्यू झाला. यानंतर त्या कारचालकाने गाडी थांबवून त्या जखमीला मदत करण्याचे सोडून कार भरधाव वेगाने आनेवाडी टोलनाक्याकडे दामटली होती. यानंतर या कारचा प्रत्यक्षदर्शींनी पाठलाग केल्यानंतर संबंधिताने ही गाडी थेट भुईंज पोलीस ठाण्यात नेऊन थांबवली. यानंतर लागलीच गाडीत असणार्या आयजी साहेबांनी थेट भुईंज पोलीस ठाण्याचा ताबा घेतला. यानंतर थेट आयजी साहेबच समोर पाहून भुईंज पोलीस ठाण्यातील अधिकार्यांसह कर्मचार्यांची तंतरली. इतर अपघातांमध्ये अपघात झाल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल केला जातो. मात्र कैसर खालीद प्रकरणात गुन्हा दाखल होण्यास तब्बल तीन दिवस पोलिसांना लागले. त्यामुळे लोकशाहीमध्ये नोकरशहांना झुकते माप दिले जाते. यावरुन निष्पन्न झाले आहे.
शुक्रवार दि. १५ रोजी दुपारी दोनच्या दरम्यान कोल्हापूरहून पुण्याकडे भरधाव वेगाने निघालेल्या इनोव्हा कार क्र. एमएच ०९ ईई ०१०८ या कारने सातार्या नजिक असणार्या डी मार्ट समोर दत्तात्रय शिवराम शेवते वय ७२ रा. भुईंज यांना उडवले होते. या भीषण अपघातात दत्तात्रय शेवते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात त्यांना अधिक उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, परंतू काळ सोकावता कामा नये, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. कैसर खालीद प्रकरणातही नेमके हेच झालेले आहे. हिट अँड रन प्रकरणात भलेभले लोक अडकलेले आहेत. मद्याच्या अंमलात असलेला बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने सुमारे वीस वर्षापूर्वी पदपथावर झोपलेल्या लोकांना चिरडले होते. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमस्वरुपी अपंगत्व आले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या घटनेतून आतापर्यंत अनेकांनी बोध घेतला असेल. कैसर खालीद सारख्या एक वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्या गाडीतून प्रवास करतो. ती गाडी एका वृद्ध व्यक्तीला चेंडूसारखी उडवते हे गाडीत बसलेल्या कायद्याचा रक्षक असणार्याला समजले नसेल तर नवलच! गाडीला एखादा खडा लागला तरी आतमध्ये बसलेल्या व्यक्तीला समजते. कैसर खालिद यांच्यासारख्या कवीमनाच्या अधिकार्याला जिवंत माणूस उडवला हे समजू नये, हे कुछ हजम नहीं होता है, कैसर खालिद प्रकरण हे हिट अँड रन प्रकरण आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणात असंवेदनशिलता दाखवल्यामुळे आज गुन्हा दाखल होण्यास तब्बल तीन दिवस ओलांडावे लागले, ही खरी शोकांतिका आहे. सर्वसामान्यांना कायद्याचा धाक असतो काय? त्याची अंमलबजावणी करणार्यांना नसतो काय? याबाबत खरेतर मंथन व्हायला हवे.
कैसर खालिद हे १९९७ च्या बॅचचे भारतीय पोलीस दलातील अधिकारी. बिहारमधील अरारिया जिल्ह्यातील ते रहिवासी आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी अभिनव उपक्रम राबविले आहेत. कविमनाच्या असलेल्या या अधिकार्याची बैठक गुलजार यांच्यापासून जावेद अख्तर यांच्याबरोबर असते. लहानपणापासूनच ऊर्दू साहित्यात अभिरुची असलेल्या या अधिकार्याने आतापर्यंत शाऊर-ए-अस्र, दश्त-ए-जान, दिवाने-शाक-अजिमाबादी हे काव्यसंग्रह लिहिलेले आहेत. ऊर्दू साहित्यामध्ये अतिशय मानाचे स्थान असलेल्या खालिद यांना महाराष्ट्र राज्य ऊर्दू साहित्य अकादमी (२०१४), इंडियन बिझनेस अँड प्रोफेशनल कौन्सिल दुबई एक्सलन्स लिडरशिप ऍवार्ड (२०१७), महाराष्ट्र शासनाचा वृक्षमित्र पुरस्कार (२००८-०९) असे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळालेले आहेत. अतिशय धोरणी असलेल्या कैसर खालिद यांची कारकीर्दही उज्वल अशी राहिलेली आहे. ऊर्दू, हिंदी, इंग्रजी, मराठी, मैथिली, भोजपुरी अशा भाषा त्यांना अवगत आहेत. अनेक राष्ट्रीय वाहिन्या, कवी संमेलने, मुशायरे आदींमध्ये ते नित्यनेमाने सहभागी होत असतात.
आपल्या २२ वर्षाच्या पोलीस सेवेतील कार्यकालात त्यांनी अभिनव उपक्रम राबविले आहेत. यामध्ये वूमन कमांडो बटालियन, रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोहीम, वृक्षारोपण आदी विधायक उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. असे असतानाही त्यांनी सातार्यात हिट अँड रन का केले? याचे उत्तर मात्र अद्याप अनुत्तरितच आहे. कैसर खालिद ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या चालकाने एका वृद्ध माणसाला उडवले, त्यावेळी खालिद यांनी पळून न जाता त्या वृद्ध व्यक्तीला रुग्णालयात वेळेत नेऊन उपचार केले असते तर कदाचित त्या वृद्धाचे प्राण वाचले असते. परंतू लोकासांगे ब्रह्मज्ञान... या म्हणीप्रमाणे कैसर खालिदही याच पठडीतील निघाले. तुम्ही काय केले आहे? यापेक्षा तुम्ही काय करीत आहात याला जास्त महत्त्व असते. सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील सलमानचे वकील ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवी यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करीत असताना फुटपाथ (पदपथ) ही काय झोपायची जागा आहे काय, असा युक्तीवाद करत प्रश्न उपस्थित केला होता. सातारा-पुणे या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. बैलाने लघुशंका करावी अशी तर्हा या रस्त्याची झाली आहे. सेवारस्ते, भुयारी रस्ते यांची पूर्णत: वाताहात झाली आहे. ज्याठिकाणी भुयारी रस्ते, सेवा रस्ते व्हायला हवेत त्याठिकाणी न करता भलत्याच ठिकाणी ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरुन लोकांना रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे सातारा- पुणे रस्त्यावर अपघात नित्याचेच झाले आहेत. याकडेही प्रकाश टाकायला हवा.
कैसर खालिद प्रकरणातही अक्षम्य अशी चुक झालेली आहे. आपल्या पदाचा व नैतिकतेचा सारासार विचार करुन खालिद यांनी पळून न जाता जखमीवर त्वरित उपचार करण्यासाठी पावले उचलायला पाहिजे होती. परंतू दुर्दैवाने ते होवू शकले नाही. या प्रकरणात केवळ चालकावर गुन्हा दाखल करुन चालणार नाही, तर आपल्या जबाबदारी आणि कर्तव्यापासून हात झटकणार्या खालिद यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा. कायदा हा सर्वांना समान असतो, हे सातारा पोलिसांनी आता दाखवून द्यायला हवे, हीच माफक अपेक्षा!
शेवटी जाता.. जाता... कवी मनाच्या कैसर खालिद यांच्यासाठी...
सफ़र में कोई किसी के लिए ठहरता नहीं,
न मुड़ के देखा कभी साहिलों को दरिया ने..
-संग्राम निकाळजे
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |