कराड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरटीओच्या मदतीने वाहनचालकांवरील कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली. या संयुक्त मोहिमेत एका दिवसात दुपारपर्यंत 100 हून अधिक वाहने जप्त करत वाहन चालकांवरील कारवाईचे शतक पूर्ण केले आहे. आतापर्यंत लाख रूपयांचा दंड करण्यात आला आहे. दरम्यान लॉकडाऊन झाल्यापासून कराड पोलिसांनी पाचशेहून अधिक वाहनांवर कारवाई केली असून, दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभर लॉकडाऊन केले. तसेच संचारबंदी व जमावबंदीचा आदेश लागू केला. याचे काटेकोर पालन व्हावे म्हणून पोलिस स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहून प्रयत्न करत आहेत. कोरोनासारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजाराचा सामना करण्यासाठी लोकांनी घरी थांबणे गरजेचे आहे. त्यासाठी तर संचारबंदी लागू करण्यात आली असून, कोणीही रस्त्यावर फिरू नये, गर्दी करू नये, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये अशा सूचना पोलिस वारंवार देत आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांना सवलत देण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण खोटा परवाना बरोबर ठेवून रस्त्यावर फिरत आहेत. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी आरटीओच्या मदतीने गुरूवारी (दि. 9) संयुक्त मोहीम राबवून कारवाईचा धडाका लावला. या कारवाईमध्ये दुचाकी, जीप, कार तसेच टेम्पो यांच्यासह विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर तसेच बोगस अत्यावश्यक सेवेचा परवाना घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करत त्यांची वाहने जप्त केली. जप्त केलेली वाहने भेदा चौकातील रिकाम्या जागेत तसेच वाहतूक शाखेसमोरील रिकाम्या जागेत लावण्यात आली आहेत. संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरल्याप्रकरणी या वाहनधारकांना लाखो रूपयांचा दंड करण्यात आला आहे.
कराड शहरातील भेदा चौकात डीवायएसपी सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील आरटीओ अधिकारी संतोष काटकर यांच्या उपस्थितीत पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी यांनी ही कारवाई केली. यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांनी भेदा चौकात टेबल मांडून वाहनधारकांवर कारवाई केली. याशिवाय कृष्णा नाका, कोल्हापूर नाका, कार्वे नाका यासह विविध ठिकाणी पोलिसांची कारवाईची मोहीम सुरूच आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |