06:43pm | Apr 16, 2018 |
सातारा : सातार्यातील मंजूर झालेले वैद्यकिय महाविद्यालय जागेवअभावी रखडले आहे. काहींनी त्याचे श्रेय घेतले. पण काँग्रेसच्याच काळात त्याला मंजूरी मिळाली आहे. मात्र अद्यापही केंद्र व राज्यातील भाजप सरकारने वैद्यकिय महाविद्यालचा प्रश्न सोडविलेला नाही. मुख्यमंत्र्यांकडून वैद्यकिय महाविद्यालच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच कामाला सुरूवात केली जाईल अशा वल्गना केल्या जात आहेत. प्रश्न हा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षाचे आमदार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे काँग्रेसचे आ. आनंदराव पाटील यांनी सातारा येथे पत्रकारांशी येथे बोलताना सांगीतले. दरम्यान कळंबे ता. वाई येथील पालकमंत्री ना. विजय शिवतारेंच्या वक्तव्यांचीही आनंदाराव पाटील यांनी खिल्ली उडवली. पालकमत्री विजय शिवतारे यांच्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर मतदार संघात किती विकास झाला? हे तेथील जनतेला माहिती आहे. प्रसिध्दीसाठी विकासाबाबात खोटी वक्तवे करून सातारा जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करू नका असा टोला लगावला.
सातारा येथील बहुचर्चित वैद्यकिय महाविद्यालयबाबत प्रश्न सुटू शकला नाही. याची खंत असून मी सातारा जिल्हा नोडल जिल्हा मानत आहे. माझ्या मागणीनुसार सातारा नुतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, वन भवन, मोळाचा ओढा ते सातारा शहर रस्त्याचे चौपदरीकरण कामे झाली आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुक्यात आरटीओ, कृषी महाविद्यालय व रस्ता रूंदणीकरणाचे काम मार्गी लागले आहे. पण सातार्यातील काँग्रेस भवनची पुर्नबांधणी होवू शकली नाही. ही वस्तुस्थिती असली तरी काँग्रेस आपल्या झोपडीत सुखी आहे. त्यांना ‘वाडा’ ‘बंगल्या’ची गरज नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले. 1957 साली आमच्या गोजेगाव ता. पाटण येथील वाड्यात केंद्रीय मंत्री व काँग्रसेचे नेते आनंदराव पाटील यांची बैठक झाली आहे. त्यानंतर 1959 साली 365 एकर जमिन कोयना धरणात गेल्याने आम्हाला विस्थापित व्हावे लागले. 1967 साली कराड नजीक विजयनगर येथे 16 एकर जमिन मिळाली. पण पुन्हा एकदा आनंदराव पाटील यांच्या घराण्याशी जोडलो गेलो आहे, याचे समाधान वाटत आहे. आम्ही धरणग्रस्तांच्या व्यथा भोगल्या आहेत. त्यामुळेच कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून धोम, कोयना व कण्हेर धरणग्रस्तांच्या पुर्नवसित गावात डांबरीकरणाचा उपक्रम राबिविला. 1978 साली इंदिरा काँग्रेसचा युवक अध्यक्ष असताना काँग्रेसशी जोडलो गेलो आहे.
काँग्रेस हाच आमचा एकमेव पक्ष आहे, असे स्पष्ट करून जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत वादावर भाष्य करणे टाळले. सध्या माण-खटाव मतदार संघात जोरदार हल्लाबोल आंदोलन राष्ट्रवादी करीत आहे, असे छेडले असता आ. आनंदराव पाटील यांनी सुचक स्मित हास्य करत चांगली गोष्ट आहे सुचक इशारा केला. वैद्यकिय महाविद्यालयाबाबत सातत्याने पाठपुरावा करीत असून विधीमंडळाच्या सभागृहातही याबाबत आवाज उठवत रहाणार आहे, याचा पुर्नउच्चार आ. पाटील यांनी केला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |