कराड : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहंम्मद पैगंबर (स्व.अ.) यांनी सांगितलेले नमाज, रोजा, जकात, हज व तौहीद या अनिवार्य कर्तव्याबद्दल आपण उपदेश करीत असतो, ऐकत असतो. परंतू, उपदेश करण्याबरोबर; ऐकण्याबरोबरच त्यावर कृती (अंमल) होणे गरजेचे आहे. एखाद्या चांगल्या गोष्टीवर कृती केल्यावर ती गोष्ट परिपूर्ण होते आणि त्यामुळे होणारा आनंद, हा शब्दात व्यक्त करण्यापलीकडचा असतो. तसेच, इस्लाम धर्माने हेही सांगितले आहे की, ज्याप्रमाणे तुम्हाला; आपल्या धर्माचा अभिमान व आदर आहे, त्याप्रमाणे इतर धर्मांचा आदर करा. या सर्व गोष्टींवर तुम्ही आम्ही सर्वांनी कृती करीत, भाईचारा निर्माण करुया. असे प्रबोघनात्मक आवाहन, आण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक प्रा. रफीक कनाई सर यांनी, येथील मुस्लिम जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने आयोजित जीवन गौरव, उद्योगरत्न, आदर्श माता, जेष्ठ नागरिक व 10 वी , 12 वी मघील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमामघ्ये, प्रमुख अतिथी पदावरुन बोलताना केले. कार्यक्रमाच्या अघ्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक हाजी ताजुद्दीन भादी (काका) होते. कराड पंचायत समितीच्या सभापती सौ. फरीदा इनामदार, मुस्लिम जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक हाजी उस्मान शेख, पुणे येथील जेष्ठ साहित्यीका सौ. तमन्ना इनामदार, संघाचे अध्यक्ष हाजी नबीसाहेब आतार, उपाध्यक्ष अल्लीभाई मांगलेकर, संचालक हाजी जहाँगीर मुल्ला, हाजी नदीम सुतार, हाजी बद्रुद्दीन मांगलेकर, प्रा. फर्जाना इनामदार, श्रीमती राबिया आवटे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.कनाई पुढे म्हणाले, शिक्षणापासून दूर असलेला 80 टक्के मुस्लिम समाज आता शिक्षणाकडे वळला असून, अनेक मुले-मुली पदवीधर होत आहेत. डॉक्टर, इंजिनिअर होण्याबरोबरच एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परिक्षांमध्ये ते यश मिळवित आहेत, आरटीओ, चार्टर्ड अकौटंट(सी,ए,), गट शिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी या पदावर त्यांची अभिनंदनीय निवडी होत आहेत; ही स्तुत्य आणि कौतुकास्पद बाब आहे, आपल्या मुला-मुलींना शिकवा; मोठे करा, शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी पालकांना केले, मुस्लिम जेष्ठ नागरिक संघाने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केलेल्या या विद्यार्थ्यांचा, व्यक्तिंचा सन्मान करुन त्यांच्या पाठीवर टाकलेली शाबासकीची थाप, ही भविष्यामध्ये त्यांना अनेक चांगले कार्य करण्यासाठी उर्जा देणारी आहे असे सांगितले, तसेच, जेष्ठ नागरिक संघ स्थापनेपासून सातत्याने हा उपक्रम राबवित आहे, त्यांच्या या विधायक कार्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघास मी मनापासून शुभेच्छा देत आहे असे शेवटी प्रा, कनाई सर म्हणाले.
साहित्यीका सौ, तमन्ना इनामदार मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, मुस्लिम समाजामधील स्त्रिया आता सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर होत असून, काळाप्रमाणे चालण्याचे तंत्र अवगत करीत आहेत, पूर्वी चूल आणि मूल एवढ्यापर्यंत मर्यादित असलेली मुस्लिम स्त्री, ही आता शिक्षण घेऊन सुशिक्षित होत आहे व पुरुषांच्याबरोबरीने वाटचाल करीत आहे, हे करण्यासाठी तिला कुटुंबियांची होत असलेली मोलाची साथ महत्वाची आहे असे सांगून, आज महिलांना 50 टक्के आरक्षण आहे, आज इथल्या 50 टक्केपेक्षा जास्त संख्येने उपस्थित असलेल्या माता-भगिनींनी दाखवून दिले आहे, ज्यांचा सत्कार आज या ठिकाणी होत आहे त्यामध्येसुध्दा महिला आणि मूलींची संख्या जास्त आहे ही अभिमानाची गोष्ट आहे असे गौरोदग़ार सौ, इनामदार यांनी काढले.
यावेळी कराड पंचायत समितीच्या सभापती सौ, फरीदा इनामदार यांनी मनोगत व्यक्त करुन, संघास शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हाजी नबीसाहेब अत्तार यांनी केले, संचालिका सौ, फर्जाना इनामदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात, मुती इलाहीबक्ष यांव्या पवित्र कुरआनच्या अध्याय पठणाने (कुरआन तिलावतने) झाली. ,शाहीन हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘स्वागतगीत’ गायले, संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा, रफीक कनाई (सर) यांना ‘जीवन गौरव’ व हाजी रशीदअहमद हाजी महंम्मद अरब यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच, अबीदा इलाही सुतार, बानूबी अजीज मांगलेकर, हव्वाबी बादशहा मुल्ला, सुरैय्या उमर देसाई, शहनाज बागवान, अंजूम अजीज सय्यद यांना ‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर, नसिम इसाक शेख यांचा ज्येष्ठ नागरिक संघ व फर्ज फाऊंडेशन कराड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नारी फर्ज पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला, हाजी निजाम मोमीन, हाजी इकबाल खतीब, नजरुद्दीन पटेल(गुरुजी), नथूलाल संदे (सर), अल्लाबक्ष शेख, आबिद मांगलेकर व दिलावर शेख(सर) यांना ज्येेष्ठ नागरिक पुरस्काराने गौरविण्यात आले,
बालवक्ता रेहान शकील नद्दाफ, बाल व्यंगचित्रकार ॠषिकेश सतिश उपळावीकर, स्केटिंग चँम्पियन महंमदअजहर सलीम मुल्ला, आस्माँ शहानवाज मुजावर, डॉ, रिजवाना अबिद मणेर, सौ, अंजूम इरफान बागवान, इरफान शब्बीर बागवान, जमिला उस्मान मुलाणी, हाजी मुनीर गुलाब बागवान, डॉ, आहेर अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ, अन्वर मुल्ला, प्राचार्य जहाँगीर अत्तार, सौ, तबस्सुम अत्तार, रियाज आलम मुल्ला, अभियंता फिरोज अत्तार, महिबूब दादा पटेल, समीर मोहंम्मदहनीफ शेख, इस्माईल कासम मूजावर यांना ‘विशेष पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले, तसेच, 10 वी व 12 वी, स्कॉलरशिप व चित्रकला परिक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
आभार सलीम शेख यांनी मानले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एच्केडी अँग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यापक मोहंम्मदलतीफ जागिरदार व अबुबकर सुतार यांनी केले, कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील हिंदू-मुस्लिम बांधव, माता-भगिनी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुनेद जमादार, जुबेर आतार, वाजीद सुतार, अख्तर आवटे, मोहसीन भालदार, साबिरमियाँ मुल्ला, कय्यूमशेठ इनामदार आदिंनी परिश्रम घेतले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |