RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

नाना पाटेकरांनी रद्‍द केली पत्रकार परिषद

08 October 2018 at 16:04

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्‍यातील वाद वाढतच चालला आहे. नाना ८ ऑक्‍टोबरला पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे तनुश्रीला उत्तर देणार होते. परिषदेत नानांसोबत दिग्‍दर्शक विवेक अग्निहोत्री आणि प्रसिध्‍द कोरिओग्राफर गणेश आचार्य देखील उपस्‍थित राहणार असल्‍याचे वृत्त होते. परंतु, आता एका रिपोर्टनुसार, ही पत्रकार परिषद रद्‍द केल्‍याचे वृत्त समोर आले. अद्‍याप नानांकडून पत्रकार परिषद रद्‍द केल्‍याची माहिती सांगण्‍यात आलेली नाही. 

तनुश्रीची तब्‍येत खराब झाल्‍यानंतरदेखील ती प्रसारमाध्‍यमांशी बोलत आहे. नाना पाटेकर प्रत्‍येक वेळी सांगत आहेत की, हे सगळं खोटं आहे. नानाने तनुश्री दत्ताला एक कायदेशीर नोटिस पाठवली आहे. तसेच तिने नानांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

'नाना मला घाबरवण्‍याचा प्रयत्‍न करू शकतात. हल्‍ला करवू शकतात. परंतु, मी त्‍यांच्‍यासमोर गेल्‍यानंतर ते माझं काहीही बिघडवू शकणार नाहीत,' असे तनुश्रीचं म्‍हणणं आहे. याप्रकरणी अनेकदा प्रसारमाध्‍यमांनी नानांना प्रश्‍न विचारले होते. परंतु, त्‍या-त्‍या वेळी नानांनी पत्रकार परिषदेत सर्व काही स्‍पष्‍ट होईल, असे सांगितले होते. आता खुद्‍द नाना पाटेकरांनी पत्रकार परिषद रद्‍द केल्‍याने अनेक प्रश्‍न उपस्‍थित केले जात आहेत. ८ ऑक्‍टोबर रोजी नाना पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, ऐनवेळेला ही परिषद रद्‍द करण्‍यात आली आहे.