सातारा : मांडवखडक ता. फलटण येथे काल रात्री बाराच्या दरम्यान घरासमोर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले असून, यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत व केलेल्या दगडफेकीत तीघे जण जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मांडवखडक ता. फलटण येथे सुमन दादासो निकाळजे, वय ५८, रा. मांडवखडक, ता. फलटण या घरात गरम होत असल्याने कुटुंबियांसमोर दारातील ओट्यावर झोपलेल्या होत्या. दरम्यान मध्यरात्री सुमारे बाराच्या दरम्यान अनोळखी चार ते पाच दरोडेखोरांनी सुमन निकाळजे यांच्या गळ्यात असलेल्या सव्वा तोळा वजनाचे सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकवले. यावेळी सुमन निकाळजे यांना जाग आली असता, त्यांनी आरडा-ओरडा केला. यानंतर कुटुंबातील सदस्य जागे झाल्यानंतर कुटुंबियांनी एका दरोडेखोराला पकडले. यावेळी आंधारात असलेल्या इतर दरोडेखोरांनी तुफान दगडफेक केली. यावेळी केलेल्या दगडफेकीत परिघा मधुकर निकाळजे, रणजित दादासो निकाळजे व नितिन निकाळजे हे जखमी झाले. दरोडेखोरांनी केलेल्या दगडफेकीमुळे पकडलेला दरोडेखोर ही पळून गेला. यामुळे या घटनेमुळे मांडवखडक गावात मध्यरात्रीच थरार उडाला होता. यावेळी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक हंकारे यांना भ्रमनध्वनी वरून माहिती दिल्यानंतर पो.नि. हंकारे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ सुत्रे हलवून पोलिस कर्मचार्यांना घटनास्थळावर पाठवले. तसेच ते स्वत:ही घटनास्थळावर येऊन जखमींना फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठवले. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी घातक शस्त्र जप्त केली आहेत. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांवर भादवी ३९५ अन्वये दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळी सातारा जिल्हा पोलिस प्रमुख श्रीमती. तेजस्वी सातपुते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक विजय कुंभार, पोलिस निरिक्षक हंकारे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक तपासाच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान मांडवखडक येथील घडलेल्या जबरी चोरीमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली असून, फलटण ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा याप्रकरणी अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |