सातारा : सावकारीप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल असलेल्या प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. खंड्या सध्या सातारा जेलमध्ये आहे. दरम्यान, पुणे येथील मोक्का कोर्टात शनिवारी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
सातार्यातील सावकारीप्रकरणी खंड्या धाराशिवकर व त्याच्या टोळीविरुध्द एकूण दोन मोक्काचे गुन्हे दाखल आहेत. खंड्यासह त्याच्या टोळीने व्याजाने पैसे दिल्यानंतर ते वसूली करण्यासाठी अक्षरश: धुडगूस घातला. सर्वसामान्यांपासून अनेकांना त्याने 10 टक्क्यापासून 20 टक्क्यापर्यंत सावकारीने पैसे दिले असल्याच्या अनेक तक्रारी पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी खंड्या धाराशिवकर याला शहर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्यावरील तक्रारींचा ओघ वाढला. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आतापर्यंत त्याच्याविरुध्द दोन मोक्का दाखल झाले आहेत.
दुसर्या मोक्काच्या गुन्ह्यात रहिमतपूर येथील महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयित खंड्या धाराशिवकर याच्याकडून तक्रारदार यांनी 2 लाख व्याजाने घेतले होते. व्याजासह सर्व पैसे परत दिल्यानंतरही संशयित आरोपींनी तक्रारदार यांचा ट्रक जबरदस्तीने चोरुन नेला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.शुक्रवारी खंड्या धाराशिवकर व अजित अशोक कुरणे उर्फ कुबड्या या दोघांना दुसर्या मोक्कातील गुन्ह्यात अटक केली. सध्या मोक्का या कारवाईचा तपास पोलिस उपअधिक्षक डॉ.खंडेराव धरणे हे करत आहेत. संशयित आरोपींना अटक झाल्याने व मोक्काचे न्यायालय पुणे येथे असल्याने शनिवारी त्यांना पुणे येथे हजर केले जाणार आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |