03:24pm | Jun 11, 2019 |
मुंबई : भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव (तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) या ऐतिहासिक स्थळास आता 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असल्याची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती घेण्यासाठी त्यांचे जन्मगाव असलेल्या मौजे नायगाव या ठिकाणास विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक सहली वर्षभर भेट देत असतात. या ठिकाणास दरवर्षी 5 लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात. ही पार्श्वभूमी विचारात घेवून यापूर्वी 'क' वर्गात असणाऱ्या या पर्यटनस्थळास आता 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
सन 2004 मध्ये शासनातर्फे मौजे नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचे राज्य संरक्षित राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील निवडक प्रसंगांची उठावदार शिल्पे असणारी शिल्पसृष्टी उभारण्यात आली आहे. तसेच त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच 03 जानेवारी रोजी या ठिकाणी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आता या स्थळास ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याने या ऐतिहासीक स्थळाच्या विकासाला अधिक प्रमाणात चालना मिळेल. तसेच त्या माध्यमातून सावित्रीबाईंचे कार्य आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या ऐतिहासीक आणि प्रेरणादायी स्थळास अधिकाधिक पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन मंत्री रावल यांनी केले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |