RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

मानसिक तयारी व आर्थिक परिस्थिती पाहून योग्य करिअर निवडा

11 June 2019 at 17:43

डॉ. दिलीप देशमुख : व्यसनापासून दूर राहण्यासाठी चांगली संगत हवी

सातारा : आजच्या घडीला शिक्षण हा एकमेव पर्याय मानवाला प्रगतीपथावर नेवू शकतो. शिक्षण घेत असतानाच आपणाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे निश्तिच केले पाहिजे. त्याचबरोबर व्यसनापासून दूर राहण्यासाठी चांगली संगत बाळगली पाहिजे. करिअर निवडताना आपली मानसिक तयारी तर हवीच पण, घरची आर्थिक परिस्थिती पाहून योग्य करिअरची निवड करावी, असे मत ख्यातनाम शिक्षण आणि शिक्षकतज्ञ डॉ. दिलीप देशमुख (एम.एस.सी.,एम.एड., बी.जे.,ए.व्ही.पी.एम. ङ्गिल.,पीएच.डी) यांनी केले. 

10 वी आणि 12 वी नंतर काय? हा यक्ष प्रश्‍न प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्याला सतावत असतो. याच प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी मोङ्गत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. शिवेंद्रसिंहराजे होते. यावेळी मिलिंद सोसे (बी.टेक. एमबीए.) आणि चेतन दिवान (एमएसडब्ल्यू, एमङ्गिल पीएचडी) या मार्गदर्शकांसह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सातारा सातारा पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, प्रा. जगदाळे सर, खाजगी शाळा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित साळुंखे यांच्यासह विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व मान्यवरांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र मंडळ पुणे विद्यापिठ, टिळक महाराष्ट्र विद्यापिठ, एस.एस.सी.बोर्ड, आय.आय.ई., बालभारती, एम.एस.सी.आर.टी., बीएआरसी (मुंबई), टिएङ्गआयआर, नॅशनल ओपन स्कूल (दिल्ली), भारतीय जैन संघटना, एआयएम, डि.वाय. पाटील शिक्षण संस्था, झील इंजिनियरिंग, दिशा अकॅडमी, एमकेसीएल, एक्सेल ग्रुप, हस्ती पब्लीक स्कूल आदी संस्थांमध्ये शिक्षक तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करणार्‍या आणि अनेक देशांतमध्ये विविध संस्थांना शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम करणार्‍या डॉ. देशमुख यांनी विविध मुद्यांना हात घालून विद्यार्थ्यांना भवितव्य घडवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, याचे सखोल मार्गदर्शन केले. व्यसनापासून दूर राहतानाच आपल्याला जे आवडते त्यातच करिअर केले पाहिजे. ठरवलेले साध्य करण्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट केले पाहिजेत. शेवटी काहीही झाले तरी, कष्टाचे ङ्गळ हे मिळतेच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगून ते साध्य करण्यासाठी परिश्रम घ्यावेत. प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही. मात्र अपयशाने खचून न जाता प्रत्येक संकटाचा सामना केला पाहिजे. आत्महत्या हे कोणत्याही संकटाचे समाधान होवू शकत नाही, असेही डॉ. देशमुख म्हणाले. 

कार्यक्रमात मिलिंद सोसे (बी.टेक. एमबीए.) आणि चेतन दिवान (एमएसडब्ल्यू, एमङ्गिल पीएचडी) यांनीही मार्गदर्शन केले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनीही आपल्या शैक्षणिक जीवनातील गोड आणि कटू आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वझिर ग्रुपचे अजय माळवदे, सुर्यकांत मोरे, राजेश जंगम, नितीन स्वामी, किरण पवार, किशोर दडस आदींनी परिश्रम घेतले.

धोम व कण्हेर धरणग्रस्तांचा आता थेट जलाशयात साखळी आंदोलनाचा इशारा

धोम व कण्हेर धरणासाठी शेकडो शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पण, पुनर्वसनासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. त्याचाच भाग म्हणून थेट धोम जलाशयात उतरून आंदोलन करण्याचा इशारा जनजागर प्रतिष्ठानचे जिल्हा समन्यवक देवराज देशमुख व श्रीहरी गोळे यांच्यासह

9 hours before

शाहूनगरमधील घुले बंधूंमुळे वाचले भेकराचे प्राण

अजिंक्यतारा किल्ल्यालगतच्या जंगलातून एक भेकर शाहूनगर परिसरात आले होते. त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चवल्याने ते गंभीर जखमी झाले. या भेकराला शाहूनगर येथे राहणार्‍या संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्याचे

9 hours before

मर्सिडीज-बेन्झतर्फे द्वितीय आणि तृतीय श्रेणी बाजारपेठांवर सातत्याने भर

मर्सिडिज-बेन्झ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झ्युरी कार उत्पादक कंपनीने महाराष्ट्रातील आपले विश्वासार्ह भागीदार बी.यू. भंडारी मोटर्स यांच्या साह्याने आपल्या मसर्विस ऑन व्हील्सफ या नाविन्यपूर्ण ग्राहक सेवेच्या दुसर्‍या टप्प्याचा शुभारंभ केला.

9 hours before

राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल

टेंभुच्या पाण्याचा बुडबुडाही माणपर्यंत येऊ शकणार नाही म्हणणा-यांना आम्ही टेंभूचे पाणी माण तालुक्यात आणून दाखवले आहे. आता उत्तर माणला जिहे - कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावांना पाणी मिळण्यासाठी

9 hours before