08:23pm | Apr 06, 2020 |
सातारा : सातारा जिल्हयाची ओळख असलेल्या जनता सहकारी बँक लि. ही नेहमीच आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर राहिली आहे. देशावर आणि राज्यावर ज्या ज्या वेळी कोणतीही आपत्ती आली तेव्हा जनता सहकारी बँकेने सढळ हाताने मदत केली आहे. सध्या देशासमोर कोरोनाचे संकट असून याकाळात पी.एम.केअर आणि मुख्यमंत्री केअरला प्रत्येकी 51 हजार जनता सहकारी बँकेच्यावतीने देण्यात येणार असल्याची माहिती भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, जनता सहकारी बँकेने यापूर्वी दुष्काळ पडला असताना चारा छावणीसाठी मदत केली होती. गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे जिल्हयातून जाणा-या महामार्गावर हजारो वाहनचालक अडकून पडले होते. या वाहनचालकांना फूड पॅकेटस आणि पाणी वाटप केले होते. तसेच महापुरात सांगली येथील वाचनालयाचे प्रचंड नुकसान झाले होते. या वाचनालयाला पुस्तक खरेदी करुन दान केली होती. तसेच देशावर आणि राज्यावर आलेल्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत केली आहे. यावेळी राज्यासमोर तसेच देशासमोर कोरोनाचे मोठे संकट असून लॉकडाऊनमुळे सर्वत्र काळजीचे सावट आहे. या संकटकाळात राज्याला आणि देशाला मदत करण्याचा निर्णय जनता सहकारी बँकेचे सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी संघाने घेतला. राज्यात सी.एम. केअरला 51 हजार रुपये तर पी.एम.केअरला 51 हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी बँकेचे चेअरमन अतुल जाधव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजाराम पवार, सेवक संचालक अनिल जठार, उमेश साठे, उमेश पाटील, विनोद शिंदे, राजन घोणे, निलकंठ सुर्वे, हमीद शेख, राजेंद्र साळुंखे, सुरेंद्र वारद यांनी पुढाकार घेतला आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |