05:52pm | Jul 09, 2018 |
सातारा : फटाक्याच्या स्टॉलसाठी व्याजाने घेतलेल्या पन्नास हजार रुपयांपोटी 1 लाख 37 हजार रुपये देवूनही फलटण येथील कुख्यात अवैध सावकार युवराज किसन पवार (पाटील) या दोघा भावांनी संगनमत करुन नितीन रमेश चांडक (वय 34) रा. मारवाड पेठ, फलटण यांचे बारसकर गल्ली येथून काल संध्याकाळी 7 वाजता अपहरण करुन मुधोजी कॉलेजच्या पिछाडीस नेवून डोक्यास पिस्तुल लावून बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये नितीन चांडक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील शासकीय सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी चांडक गेले असता फलटण शहर पोलिस ठाण्यातून तक्रार न घेता हाकलून दिल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नितीन रमेश चांडक (वय 34) रा. मारवाड पेठ, फलटण येथे कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत. सुमारे सहा वर्षापूर्वी नितीन चांडक यांनी फटाक्याचा स्टॉल टाकण्यासाठी युवराज किसन पवार (पाटील) याच्याकडून व्याजाने पन्नास हजार रुपये घेतले होते. दरम्यान चांडक यांनी वेळोवेळी युवराज पवार यास व्याजाची रक्कम दिली होती, तसेच काही दिवसांपूर्वी मुद्दल व व्याजाचे असे सर्व मिळून 1 लाख 37 हजार रुपये युवराज पाटील यास पोहोच केले होते. दरम्यान, काल दि. 8 रोजी नितीन चांडक हे बारसकर गल्ली येथील किरकिरे (श्री क्लासेस) येथे थांबले असताना युवराज किसन पवार (पाटील) आणि प्रसाद किसन पवार (पाटील) रा. सोमवार पेठ, फलटण व अनोळखी तिघाजणांनी नितीन चांडक यास पिस्तुलाचा धाक दाखवून गाडीत बसायला लावले. गाडीत बसल्यानंतर युवराज व प्रसाद पवार यांनी आमचे व्याजाने दिलेले पैसे देवून टाक नाहीतर येथेच तुला खलास करुन टाकेन, अशी धमकी दिली. यावेळी नितीन चांडक यांनी मी आतापर्यंत तुम्हाला 1 लाख 37 हजार व्याजासह दिलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला कोणतेही पैसे देणे लागत नाही, असे सांगितले असता गाडीतील पाचही जणांनी चांडक यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी संबंधितांनी गाडी मुधोजी कॉलेजच्या पिछाडीस असणार्या सातारा पुलाजवळ नेऊन उभी केली व तिथे अंधारात गाडीतून आणलेल्या लोखंडी पाईप, फायटर, बिअरची बाटली उघडण्यासाठी वापरण्यात येणारा ओपनर व लाथा-बुक्क्यांनी तुफान मारहाण केली. तसेच चांडक यांच्या पत्नीला त्यांच्याच फोनवरुन पैशाची मागणी केली. या सर्व प्रकारामुळे चांडक यांची पत्नी भयभीत झाली होती. त्यांनी संबंधितांना मारु नका, अशा विनवण्याही केल्या होत्या. मात्र संबंधितांकडून चांडक यांच्या पत्नीला शिवीगाळ व धमक्या देण्यात आल्या. बेदम मारहाण केल्यानंतर चांडक यांना जिंती नाक्यावर फेकून देण्यात आले. त्यानंतर चांडक यांनी कुटूंबियांना फोनवरुन मला जिंती नाक्यावर फेकून देण्यात आले आहे. मला दवाखान्यात घेवून जा, असे सांगितले. यानंतर त्यांच्या पत्नीने तात्काळ जिंती नाक्याकडे धाव घेत नितीन चांडक यांना थेट फलटण शहर पोलीस घेवून गेले. तेथे त्यांनी संबंधितांची नावे सांगून तक्रार दाखल करण्याची विनंती केली. मात्र तेथे कर्तव्यास असणार्या पोलिसांनी उलट नितीन चांडक व त्यांच्या कुटूंबियांना दमदाटी करुन फलटण शहर पोलीस ठाण्यातून हाकलून लावले. गंभीर जखमी झालेल्या नितीन चांडक यांना आज पहाटे कुटूंबियांनी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना भ्रमणध्वनीवरुन दिली असता संदीप पाटील यांनी तात्काळ या घटनेची दखल घेवून संबंधित संशयित आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |