02:52am | Aug 21, 2019 |
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्री. छ. उदयनराजे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा या निवासस्थानावर भेट घेवून राष्ट्रवादीतून भाजपच्या वाटेवर असणार्या अनेकांना जोरदार चपराक दिली आहे. जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ पुढारी भाजप प्रवेशासाठी लायनीत उभे असताना उदयनराजेंनी आज थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे. उदयनराजेंचे पारंपारिक शत्रूंना मात्र या भेटीच्या निमित्ताने चेकमेट मिळाला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या लढाई अगोदरच विरोधकांनी शस्त्रे म्यान केल्यामुळे तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील बिनीचे पुढारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करीत असताना राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या सातार्यातही बुरजाला तडे जावू लागले आहेत. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे विद्यमान आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर हेसुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, मिस्टर रामराजेंनी पाठीमागे सैन्य नसतानाही अवास्तव मागण्या केल्यामुळे खुद्द भाजप हायकमांड नाराज होते. एकेकाळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला धाराशायी होतोय की काय, असे वाटत असतानाच आज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती संदर्भात वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेवून पूरग्रस्त भागातील लोकांना जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली. वरकरणी ही जरी डिप्लोमॅटिक भेट असली तरी उदयनराजेंच्या राजकीय भविष्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरली आहे.
माजी खा. लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनानंतर विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजेंनी जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे हातात घेतली. परंतू जिरवाजिरवीच्या राजकारणात मिस्टर रामराजेंनी अनेकांची मने दुखावली. यामध्ये दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे खा. श्री. छ. उदयनराजे हे अग्रस्थानी होते. खा. उदयनराजे व मिस्टर रामराजे हा कलगीतुरा सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राने पाहिलेला आहे. दोन वर्षांपूर्वी उदयनराजे नकोत, असे म्हणत दस्तुरखुद्द शरद पवारांना विरोध करुन मिस्टर रामराजेंनी उदयनराजेंच्या वाढदिवसावर बहिष्कार टाकला होता. मिस्टर राजेंशी पंगा नको म्हणून राष्ट्रवादीचे आमदारही उदयनराजेंच्या भव्यदिव्य वाढदिवस सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खा. उदयनराजेंची तोंडभरुन स्तुती करीत सातारा शहराचे जिव्हाळ्याचे प्रश्न असणारे कास तलावाची उंची, पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या प्रमुख मागण्यांना सभामंचकावरुनच मंजुरी दिली होती. खा. उदयनराजे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भन्नाट ट्युनिंग आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील आमदार, खासदार रांगेत उभे राहून प्रवेश घेतात. मात्र, खा. श्री. छ. उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे ठरविल्यास तेही उदयनराजेंचे मुरिद असल्याप्रमाणे भेट देतात. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आ. शिवेंद्रराजे भोसले भाजपवासी झालेत. गेली चार वर्षे शरद पवारांच्या मेहरबानीवर विधान परिषदेच्या सभापती पदाची खुर्ची उबवणारे मिस्टर रामराजेही खा. शरद पवारांचे कस्मे-वादे विसरुन कुलाबा, फलटण व खंडाळा या मतदारसंघाची जहागिरी भाजपकडे मागत आहेत. मात्र या जहागिरीची सनद मिळण्याअगोदरच खा. उदयनराजेंनी आपल्या भात्यातील खास देवेंद्रास्त्र काढून जिल्ह्यातील भाजप प्रवेशेच्छुकांच्या भ्रुणहत्त्या केलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजारबुणग्यांपेक्षा जिंदादिल उदयनराजेंनाच अधिक पसंती दर्शवलेली आहे.
माढा लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याबद्दल अनेकांनी गळे काढले. मोदी-शहांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेकांच्या शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. पण रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे या जय-विरुच्या जोडीने इतिहास घडविला. ज्यांना सतत पाण्यात पाहत आलो, अशी मंडळी आमदार-खासदार झाली. पण हाय... शेवटी सत्तेत तर रहायचंय. उद्या ज्या खा. शरद पवारांनी सोन्याचे दिवस दाखवले, त्या शरद पवारांनाही शिव्यांची लाखोली वाहून भाजप प्रवेश मिळवू पाहणार्या सातारा जिल्ह्यातील कृतघ्न फलटण नरेशांना खा. श्री. छ. उदयनराजेंनी आज खर्या अर्थाने चेकमेट दिलेला आहे. बहुधा ही सुद्धा शरद पवारांची खेळी असू शकते. डॅमेज कंट्रोलसाठी शरद पवार हे नाव देशभरात प्रसिद्ध आहे. एवढेच काय, पंतप्रधान नरेंद्र मोदीही खा. शरद पवारांचे मुरिद आहेत. खा. श्री. छ. उदयनराजे गेले की त्यांना पाठवले, हा जरी संशोधनाचा विषय असला तरी खा. उदयनराजेंनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेले आहेत. राहिला प्रश्न फलटण नरेशांचा. भाजप हायकमांडला त्यांची लायकी माहित आहे. लंगड्या घोड्याच्या जिवावर ते कितीसे मैदान मारणार? कुलाबा, खंडाळा, फलटण हे पर्यटनासाठी ठिक आहे. मात्र राजकीय पुनर्वसनासाठी फर्ग्युसन कॉलेज रोडच आधार देवू शकतो, हे खा. श्री. छ. उदयनराजे यांनी आज आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
- संग्राम निकाळजे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |