सातारा : सातारा तालुक्यातील धावडशी या ऐतिहासिक गावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा गेल्या दोन- तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. गाव मोठे असल्याने पाणीपुरवठा योजनाही भविष्यातील लोकसं‘या गृतीह धरुन मुबलक पाणीपुरवठा करणारी असावी, असा मानस ठेवणार्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी धावडसी पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून तब्बल 63 लाख 77 हजार रुपयांचा भरिव निधी मिळवला आहे. यामुळे धावडशीकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. गाव मोठे पण, पाणीपुरवठा योजना त्याप्रमाणात तोकडी असल्याने धावडशी गावातील लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. प्रामुख्याने उन्हाळ्यात पाणीसमस्या भेडसावत होती.
मुबलक पाणी मिळावे आणि पाणीटंचाईचा प्रश्न मिटावा यासाठी ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत यांनीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे पाणीपश्न सोडवण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार सातारा पंचायत समितीने धावडशी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करुन राज्य शासनाकडे पाठवला होता. यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करुन भरिव निधी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
या प्रयत्नास नुकतेच यश मिळाले असून शासनाने धावडशी गावच्या पाणीपुरवठा योजनेला नुकतीच तांत्रीक मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून धावडशी येथील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 63 लाख 77 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये गावातील सार्वजनिक विहीरीची खोली वाढवणे, विहीरीत आडवे बोर मारणे, विहीरीपासून टाकीपर्यंत नवीन पाईपलाईन टाकणे, 56 हजार लिटरची नवीन पाणीसाठवण टाकी बांधणे, नवीन पाणी वितरण व्यवस्था करणे यासह सिध्दार्थनगरसाठी स्वतंत्र 16 हजार लिटरची पाणीसाठवण टाकी बांधणे आणि त्या परिसरातही नवीन वितरण व्यवस्था करणे ही कामे केली जाणार आहेत. सदर कामास तांत्रीक मंजुरी मिळाली असून लवकरात लवकर निविदा प्रकि‘या राबवून त्वरीत कामास सुरुवात करा. काम दर्जेदार करुन काम लवकरात लवकर पुर्ण करा, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत अधिकार्यांना केल्या आहेत. दरम्यान, धावडशीकरांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |