सातारा : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या व लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये एकमेकांविरोधात शड्डू ठोकून दोन हात करणारे माजी खासदार उदयनराजे भोसले व माजी आमदार शशिकांत शिंदेंनी एकमेकांना धोबीपछाड देत या निवडणुकीत दोघांचेही नुकसान करुन घेतले. पराभवानंतर समोरासमोर न आलेले जिल्ह्याच्या राजकारणातील हे दोघेही दिग्गज शेंद्रे येथील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले. एकमेकांना जादुची झप्पी देत काही सेकंदात नजरेआडही झाले. परंतू या भेटीमुळे सातारचे राजकारण पिंगा घालू लागले. परंतू काल माजी आ. शशिकांत शिंदेंनी या जादुच्या झप्पीवर लेटर बॉम्ब टाकून उदयनराजेंवर सडकून टीका केली. मात्र उदयनराजेंनी या प्रकरणावर चुप्पी साधत आ. शिंदेंच्या लेटरहेडला कुठल्याही प्रकारचा अद्याप प्रतिसाद न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेली दहा वर्षे एकमेकांच्या गळ्यात गळा घालून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा गाडा हाकणारे माजी आ. शशिकांत शिंदे व माजी खा. उदयनराजे हे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात ठाकले. उदयनराजेंनी नसता उपद्व्याप करीत खासदारकीचा राजीनामा देत भाजप प्रवेश केला. जिल्ह्यातील जनतेवर पोटनिवडणूक लादली. उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडू नये यासाठी आ. शशिकांत शिंदेंनी जिवाचे रान केले. परंतू नागपूरच्या फडणवीसांची गोळी त्यांच्यासाठी अफूची गोळी ठरली. चार महिन्यांपूर्वी हातात हात घालून प्रचारसभा गाजविणारे शशिकांत शिंदे-उदयनराजे काही महिन्यातच एकमेकांचे जानी दुश्मन झाले. एकमेकांना अस्मान दाखविण्याच्या नादात दोघांचेही पानिपत झाले. शेवटी दोघांच्या झुंजीत फायदा मात्र एका कोल्ह्याचा झाला. एरव्ही समोरासमोर येण्याचे टाळणारे उदयनराजे व शशिकांत शिंदे शेंद्रे येथील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने समोरासमोर आले. दोघांनी समोरासमोर आल्यानंतर काही सेकंद एकमेकांचे कान फुंकले. परंतू त्यानंतर उदयनराजे-शिंदे भेटीवर जिल्हाभर तुफान खल झाला. अखेर या चर्चांवर काल शशिकांत शिंदेंनी लेटर बॉम्ब टाकत उदयनराजेंवर जहरी टीका केली. दुधात मिठाचा खडा पडावा अशा पद्धतीची खळबळ सातारच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली. शिंदेंच्या लेटर बॉम्बनंतर उदयनराजे काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असतानाच यासंदर्भात ना उदयनराजेंकडून ना जलमंदिरकडून कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. एकूणच राज्यात झालेल्या अनपेक्षित सत्तांतरामुळे उदयनराजे बॅक फूटवर गेले, असे बोलले जात आहे. असे असले तरी शशिकांत शिंदेंना मात्र राष्ट्रवादीकडून महत्त्वाचे पद अथवा मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरेगावच्या विद्यमान आमदाराच्या गोटात खळबळ उडाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |