कराड : येथील डॉ.अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्युटस् डॉ.दौलतराव आहेर अभियांत्रिकीच्या मैदानावर सुरू असलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सातारा विभागीय मुलांच्या कबड्डी स्पर्धांमध्ये, डि.पी.कॉलेज कोरेगांवच्या संघाने कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक संघावर ४ गुणांनी विजय मिळवून, डि.पी.कॉलेज संघ विजेता ठरला तर, उपविजेता कृष्णा महाविद्यालय संघ राहीला. प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊरच्या संघाने आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा संघावर मात करीत, तृतिय क्रमांक प्राप्त केला. तर, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास चतुर्थ क्रमांक मिळाला.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांंचा उद्घाटन समारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त नितिन मदने यांचे हस्ते व महाविद्यालयाचे संस्थापक,अध्यक्ष डॉ.अशोकराव गुजर यांच्या अध्यक्षतेखाली झाला होता. स्पर्धांमध्ये सातारा जिल्हयातील विविध महाविद्यालयातील २८ संघांनी सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या प्रत्येक सामन्यामधून वरील विजेते चार संघ, आंतर विभागीय स्पर्धांसाठी पात्र ठरले.
विजेत्या संघाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अन्वर मुल्ला, विभागप्रमुख प्रा.प्रकाश चोरगे, सातारा विभागाचे सचिव प्रा.प्रकाश चौगुले, दादासोा पाटील व क्रिडासंचालक प्रा.अयुब कच्छी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व फिरता चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी विजेत्या संघाचे क्रिडा संचालक, विभागप्रमुख, आधिष्ठाता, प्राध्यापकवृंद, ग्रंथपाल, टिपीओ, अधिक्षक, लेखापाल, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |