03:02am | Feb 18, 2020 |
सातारा : घरफोडी चोरी गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले. संशयित आरोपीवर बोरगाव पोलीस ठाण्यात चोरी व घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत. गुन्हे घडल्यापासून तो फरार होता. अनिकेत संतोष वाटोंबळे (वय 20, रा. निनाम ता. जि. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरगाव ता. सातारा परिसरात चोरी व घरफोडी यासारखे गुन्हे करून अनिकेत वाटोंबळे हा संशयित आरोपी फरारी होता. दि.17 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना चोरी, घरफोडी गुन्हयातील पाहिजे असलेला संशयित आरोपी अनिकेत वाटोंबळे हा विरेंद्र ऍकॅडमी शेजारी नागठाणे (ता. जि. सातारा) परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड व त्यांचे पथकास संशयित आरोपीस ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विरेंद्र ऍकॅडमी शेजारी, नागठाणे परिसरात सापळा लावून घरफोडी चोरीच्या गुन्हयात पाहिजे असलेल्या अनिकेत वाटोंबळे या संशयित आरोपीस ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीकामी बोरगाव पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांचे सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड पोलीस हवालदार तानाजी माने, संतोष पवार, कांतीलाल नवघणे, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, निलेश काटकर, विशाल पवार, विक्रम पिसाळ, चालक पोलीस नाईक विजय सावंत यांनी सहभाग घेतला आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |