RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

रेठरे बुद्रूकचा पूल सुस्थितीत आणण्यासाठी माझे प्रयत्न राहतील : आ.पृथ्वीराज चव्हाण

13 August 2019 at 14:11

कराड : रेठरे बुद्रुक येथे महापूर परिस्थितीचा व झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. याप्रसंगी त्यांच्या समवेत भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, कृष्णेचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी आ. चव्हाण यांच्यासमोर प्रामुख्याने विविध समस्या मांडल्या.

आ.चव्हाण यांनी कृष्णा नदीवरील पुलाची पाहणी केली. व बंद केलेल्या पुलाच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली. मुस्लिम समाजाच्या शाही कब्रस्तानमधील साकव पूल, मातंग समाजातील काही घरांची अतिवृष्टीने व महापुराने झालेल्या पडझडीची पाहणी केली. त्यांच्यासमोर खारे फाट्यावरील जलसंपदा विभागाच्या जलनिसरण ड्रेनेजच्या पडझड झालेल्या साकव (फरशी वजा) पुलाच्या दुरुस्ती संबंधी शेतकर्‍यांनी व्यथा मांडल्या. रेठरे बुद्रुक-कृष्णा कॅनॉल ते खारे फाटा या कॅनॉलवरील रस्त्याची आपत्कालीन मार्ग म्हणून दुरुस्ती करण्यात यावी, ही प्रामुख्याने मागणी करण्यात आली. रेठरे बुद्रुक ते गोंदी शिव रस्त्यावरील आंबेकरी स्कीमकडे जाणार्‍या रस्त्याची शेतकर्‍यांनी मागणी केली. सदर दौर्‍यामध्ये पूरग्रस्त, शेतकरी व ग्रामस्थांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. उत्तमराव मोहिते, जयवंतराव दमामे, कृष्णत चव्हाण, दिग्विजय उर्फ आबा सुर्यवंशी, अभिजीत सोमदे, सनी मोहिते, रियाज मुजावर, तोहीद आंबेकरी, उत्तम इंगळे यांनी पुरस्थितीचा आढावा दिला.

दरम्यान आ.चव्हाण यांनी कार्वे पूल व पूरग्रस्त कुटुंबांना भेटी दिल्या. कोडोली येथे पुरामध्ये घरात पाणी आलेल्या ठिकाणांची पाहणी केली. व तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, नुकसानीचे पंचनामे करून घ्या. रोगराई पसरू नये, याकरिता फॉगिंग मशिनद्वारे फवारण्या करण्याबाबत संबंधित यंत्रणेस सूचना देऊ. दुशेरे येथे त्यांनी गावातून बाहेर येणार्‍या ओढ्यावरील पुलाची तसेच पाणी आलेल्या घरांची पाहणी केली. त्यानंतर तेथील मारुती मंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी त्यांच्या विविध अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्या अडचणी सोडविण्याबाबत त्यांनी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.

शेरे येथे भेटीवेळी ग्रामस्थांनी आपद्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या प्रशासकीय अडथळ्याची माहिती दिली. रस्ता करतेवेळी झालेल्या जमिनीच्या आरक्षणाचा मोबदला अद्याप शासनाकडून मिळालेला नाही. त्याचबरोबर या रस्त्याची नव्याने उभारणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी उपस्थित मंडलाधिकारी जे.बी.बोडके, गावकामगार तलाठी एफ. एस.आंबेकरी यांना योग्य त्या सूचना आ. चव्हाण यांनी दिल्या. यानंतर आ. चव्हाण यांनी गोंदी व खुबी येथील पूरस्थितीत झालेली हानी व पाणी गेलेल्या घरांची पाहणी केली. तेथे त्यांनी ग्रामस्थांना पूरस्थिती ओसरल्यानंतर पंचनामे करण्याचे आवाहन केले.

या संपूर्ण दौर्‍यात त्यांच्या समवेत भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ.इंद्रजीत मोहिते, कराड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, एनएसयुआयचे शिवराज मोरे, जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरराव खबाले, जिल्हा परिषदेचे सदस्य निवासराव थोरात, कृष्णेचे माजी संचालक माणिकराव जाधव, दिपक पाटील, मारुती निकम, कराड तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष वैभव थोरात, शब्बीर मुजावर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

नदीकाठी पुरामुळे नळपाणी पुरवठा करणार्‍या योजना पाण्याखाली गेल्यामुळे पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. याकरिता पूरस्थितीतील या महत्वाच्या समस्येला मलकापूर नगरपंचायत धावून आली आहे. जागतिक पातळीवर नावाजलेल्या मलकापूरमधील 24 बाय 7 योजनेचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करण्याचे काम उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या दोन ते दिवसापासून मलकापूरचे शुद्ध पाणी या विभागातील लोकांना पिण्यास उपलब्ध झाले आहे.

जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला.

1 hour before

फलटण येथील दत्त नगर येथे महिलेचा खून

दत्त नगर, चौधरवाडी ता. फलटण येथील हेमंत निंबाळकर यांच्या शेतातील घरात रहात असलेल्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना घडली असून अरीफा रशीद शेख (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

13 hours before

इथिओपियाचा फिक्रू अबेरा दादी प्रथम

ढगाळ वातावरण... यवतेश्वर घाटातील धबधबे ...रस्त्यावर आलेले ढग ... अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे

13 hours before

खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांना दि.२६ ते ३१ आँगस्ट कालावधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात क्रांतीज्योती अंतर्गत महिला सदस्यांना दि.२६ ते २८ आणि पुरुष सदस्यांना दि.२८ ते ३१ आँगस्ट या

13 hours before