02:14am | Sep 02, 2018 |
वडूज : येथील डॉक्टरांना सुर्याचा धाक दाखवत मारहाण करून तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न करीत त्यांच्याकडील अर्धा तोळ्यांची सोन्याची अंगठी व 1150 रुपये असा 15 हजार 150 रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत चौघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चौघांपैकी तीन जणांना वडूज पोलिसांनी तात्काळ अटक केली. याबाबतची फिर्याद येथील वैद्यकीय अधिकारी संतोष मोरे यांनी दिली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि. 31 रोजी दुपारी चारच्या सुमारास तडवळे गावाच्या हद्दीत डॉक्टर संतोष मोरे व त्यांचा मुलगा त्यांच्या चार चाकी गाडीने जात असताना पिंगळजाई मंदिराजवळ त्यांच्या गाडी ला कट मारल्याने डॉक्टर मोरे त्यांना म्हणाले, तुम्हाला गाडी नीट चालवता येत नाही का? असे त्यांनी विचारले असता, दारू पिलेल्या चार अनोळखी इसमानी त्यांना व त्यांच्या मुलाला शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत मोरे वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
दरम्यान त्याच सायंकाळी साडेसहा च्या सुमारास डॉक्टर मोरे, त्यांचा चुलत भाऊ व त्यांचा मुलगा त्यांच्या चार चाकी गाडीतून वडूज-दहिवडी रोड लगत असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेले असता दर्शन करून ते गाडी जवळ आलो असता तडवळे येथे मारहाण करणारे चार इसम त्यांच्या दोन मोटार सायकल वरून आले व डॉक्टर मोरेना म्हणाले, आमच्या विरुद्ध तक्रार देतोस काय तू, आम्हाला काय समजतोस ? तुमच्याकडे बघतो असे म्हणत त्यातील दोघांनी मी धीरज दिनकर मदने व त्याच्या सोबत असलेल्या इसमाने मी अक्षय अशोक मदने अशी नावे सांगितली. या दोघांनी डॉक्टर व त्यांचा चुलत भाऊ यांच्या बरोबर झटापट करत त्यांचे खिशे तपासू लागले. यावेळी त्यांनी त्यास प्रतिकार करत असताना अक्षय मदने याने पाठीमागून डॉक्टर यांना मिठी मारली. धीरज मदने याने डॉक्टरांच्या उजव्या हातातील अर्धा तोळे सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. त्यावेळी अंगठी काढताना त्याच्याजवळ असणारा सुरा त्यांना डॉक्टरांच्या गळ्यावर ठेवला. त्याचवेळी डॉक्टरांच्या चुलत भावास त्यांच्या सोबत असणार्या दोन अनोळखी इसमानी हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम 1150 रुपये चोरून नेले तसेच 14 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेली असल्याची फिर्याद त्यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून वडूज पोलीस ठाण्याचे पो. उपनिरीक्षक योगेश शेलार व पो. हवा. संग्राम बाबर यांनी या घटनेतील असणार्या अक्षय अशोक मदने व धीरज दिनकर मदने या दोन आरोपींना तातडीने अटक केली. तर रात्री उशिरा सागर उत्तम जाधव यास अटक करण्यात आली. दि. 1 रोजी त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पो. उपनिरीक्षक योगेश शेलार करीत आहेत.
आरोपींची पोलिसांशी झटापट..
घटना घडली त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार व काही पोलीस कर्मचारी हे आरोपीना पकडण्यास गेले असता त्यांना पकडताना आरोपींनी पोलिसांशी झटापट केली. तर पोलिसांनी मोठया शिताफीने त्यांच्या मुसक्या आवळल्या.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |