02:49am | Mar 12, 2018 |
सातारा : जिल्हा कृषी महोत्सवामुळे प्रगत कृषी तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास मदत होणार असून यामुळे त्यांना कृषी उत्पादनात मोठी वाढ होईल, असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी आज व्यक्त केला.
दौलतनगर, मरळी ता. पाटण येथे 10 ते 14 मार्च दरम्यान जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज कृषीभुषण प्रयोगशील शेतकरी कुसुमताई करपे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक देसाई, कृषी उपसंचालक गुरुदत्त काळे, आत्माचे उपसंचालक विजयकुमार राऊत, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल, कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, पाटणचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे आदी यावेळी उपस्थित होते.
कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती, शेतकरी शास्त्रज्ञ व संशोधन-विस्तार-शेतकरी-विपणन साखळी सक्षमीकरण, समुह, गट संघटीत करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा व ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देणे हे या जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजनाचा उद्देश असल्याचे सांगून या जिल्हा कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहनही श्री. बोरकर यांनी शेवटी केले.
या महोत्सवामध्ये मस्त्य विभाग, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, वन विभाग, पशुसंवर्धन विभाग, कौशल्य विकास, कृषी विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल, बँक ऑफ महाराष्ट्र, रेशीम कार्यालय, प्रदुषण नियंत्रण मंडळ, जिल्हा उपनिबंधक, खादी व ग्रामोद्योग मंडळ कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा),जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांच्यासह विविध विभागाचे स्टॉल या महोत्सवात लावण्यात आले असून सर्व या स्टॉलद्वारे शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहेत.
जलयुक्त शिवार मॉडेल कृषी महोत्सवाचे प्रमुख आकर्षण
जिल्हा कृषी महोत्सवामध्ये जलयुक्त शिवार अभियानावर आधारित गावाचे मॉडेल उभे करण्यात आले आहे. हे मॉडेल जिल्हा कृषी महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. यामध्ये जलयुक्त शिवार अभियानामुळे गावाला झालेला फायदा, सिमेंट बंधारे, नालाबंडींग, अशी कामे घेण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. त्याचबरोबर पाण्याची कशी बचत करावी, ठिबक सिंचनाचा उपयोग, पाणी कमी लागणाऱ्या पिकांची निवड यामध्ये फळबाग लागवडीचा समावेश करण्यात आला आहे. हे मॉडेल पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |