कोरेगाव : कोरेगाव-राज्यमहामार्गावर मुगाव फाट्या नजीक असलेल्या अलंकार धाब्याचे मालक ज्योतीराम महादेव कदम (वय 42) याच्या खुन प्रकरणातील संशयीत फरार प्रमुख आरोपी लक्ष्मीबाई संतोष चव्हाण (वय 35) (रा. मुगाव फाटा, कोरेगाव, मुळ गाव, कुंडल, पोस्ट शावळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) हिला कोरेगाव रेल्वेस्टेशनवर कोरेगाव पोलीसांनी ताब्यात घेतले. तिला कोरेगाव न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपी लक्ष्मीबाई चव्हाण हिला 19 नोव्हेंबर 2018 पर्यंत तब्बल 13 दिवसाची पोलीस कोठडी दिली. पोलीस तपासात आढळून आलेल्या संतोष राठोड आणि आज्या उर्फ सचिन धनगर (मूळ गाव धरणगाव) या संशयीत आरोपींचा शोध कोरेगाव पोलीस घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 27 जुलै 2018 ते 30 जुलै 2018 च्या दरम्यान कोरेगाव तालुक्यातील पाडळी गावच्या हद्दीत मुगाआबा यांचे वस्तीजवळ धोम कॅनॉलमध्ये अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन अलंकार धाब्याचे मालक ज्योतीराम महादेव कदम (मूळ रा. जायगाव, ता. कोरेगाव) डोक्यात धारधार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. ज्योतीराम कदम यांचा खून करुन त्याचे प्रेत जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला असलेल्या पाडळी गावच्या हद्दीतील धोम कॅनॉलमध्ये टाकून देण्यात आले होते.
ज्योतीराम कदम यांच्या खुनाचा तपास गेली नऊ दिवस सुरु होता. पोलीस तपासामध्ये मुुगाव फाट्यानजीक मासे, सुकट, सोडे, बोंबील विक्री करणार्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील महिलेचा या खुना मागे हात असल्यास संशय कोरेगाव पोलीसांना तपासात आढळून आला होता. संशयीत महिला आरोपीचा शोध पोलीस पथकाच्या माध्यमातून अक्कलकोट पुणे या विविध ठिकाणी सुरु होता. आज 6 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी संशयीत महिला आरोपी लक्ष्मीबाई चव्हाण (मूळ रा. कुडल, ता. अक्कलकोट) कोरेगाव रेल्वेस्टेशनवर आल्याचे कोरेगाव पोलीसांना संशयीत महिला आरोपी लक्ष्मीबाई चव्हाण (वय 35) हि कोरेगाव रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले. दुपारी तीन वाजता कोरेगाव पोलीसांनी महिला आरोपीला कोरेगाव न्यायालयात हजर केले असता कोरेगाव न्यायालयाने लक्ष्मीबाई चव्हाण हिला 19 ऑगस्ट पर्यंत 13 दिवसांची पोलीस कोठडी दिली.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |