11:50pm | Oct 15, 2018 |
सातारा : फलटण तालुक्यातील ज्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद असतील त्या तात्काळ सुरु करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी. ज्या योजना खराब असतील त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज केल्या.
फलटण तालुक्याच्या टंचाई संदर्भात आढावा बैठक आज पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसिलदार विजय पाटील, पंचायत समिती सभापती प्रतिभा धुमाळ आदि उपस्थित होते.
कॅनॉल लगत जे पाझर तलाव आहेत त्याचे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत् खोलीकरण व रुंदीकरण करावे. त्यासाठी जलसंपदा विभागाकडील यंत्र सामुग्री पुरविण्यात येईल. कामे झाल्यानंतर कॅनॉलचे पाणी विहिरी आणि पाझर तलावात सोडण्याचे नियोजन करण्यात येईल. फलटण तालुक्यात 87 हजार 832 जनावरे आहेत. या जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन आतापासूनच केले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा परिषद आणि कृषी विभागाने बियाणे उपलब्ध करुन द्यावेत. जे पाणी आता उपलब्ध आहे त्याचे योग्य ते नियोजन करा. गरज पडल्यास विहिरी अधिग्रहण करा. टंचाईच्या उपाययोजना या तात्पुरत्या करु नका. कायमस्वरुपी टंचाईवर कशी उपयोजना करता येईल तसा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केल्या. दि. 20 आक्टोबर रोजी आपण टंचाई संदर्भात आढावा बैठक घेणार आहोत, त्या बैठकीत येतांना परिपूर्ण टंचाई आराखडा सादर करावा. प्रत्येक दोन महिन्याला टंचाईबाबतचा आढावा आपण घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |