08:03pm | May 30, 2018 |
सातारा : शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी वारंवार शासनाकडे मागण्या करुन देखील शासन यंत्रणा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही लोकशाही मार्गाने व शांततेच्या मार्गाने मागण्या मांडून शासनकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी दि. 1 जून पासून बेमुदत संपावर जात आहोत. या संपात राज्यातील सर्व शेतकरी सहभागी होणार असून शेतकऱ्यांनी संप यशस्वी करावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे व धर्मराज जगदाळे यांनी केले आहे.
स्वामीनाथन आयोग लागू करावा, राहूरी कृषी विद्यापीठाच्या सूचनेनुसार दुधाला भाव द्यावेत, महाराष्ट्रातील शेतकऱयांचा सातबारा कोरा करावा, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे कृषीपंपांची वीजबिले माफ करावीत, हमीभावाबाबत ठोस निर्णय घेण्याची भूमिका घ्यावी आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने राज्यभर हा संप आयोजित केला आहे. 1 जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या भावना ओळखून तातडीने न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे, अन्यथा भविष्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पध्दतीने शेतकरी संघटनेला आंदोलन छेडावे लागेल. तेव्हा मग शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करु नका. शेतकरी जगला पाहिजे तरच समाज जगणार आहे हे जाहीर सभामध्ये बोलण्यापेक्षा ते कृती करुन दाखवा, असे आवाहनही गोडसे व जगदाळे यांनी केले आहे.
शेतकरी संपाबाबत जागृती करण्यासाठी राज्यपातळीवर गावागावात संपर्क साधण्याचे काम सुरु आहे. शेतकरी, वाहतूकदारांनी संपात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शेतकरी संघटना न्याय व हक्कासाठी लढत आहे. आता लोकशाही मार्गाने जावून देखील न्याय देण्याची भूमिका शासन घेणार नसेल तर शेतकऱयाच्या पोरांनी हातात दांडकेच घेतले पाहिजे ही शासनाची अपेक्षा आहे काय ? असा सवालही शंकरराव गोडसे यांनी केला आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |