सातारा : हिंदवी स्वराजाचे तिसरे छत्रपती शाहूमहाराज यांच्या दि. 18 मे रोजी होणार्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या तख्ताच्या वाडयातून स्वराज्याचा कारभार अखंड हिंदुस्थानात झाला होता, त्या खलबतखान्याच्या स्वच्छतेसाठी सोमवारी शाहू उद्यानात दक्ष विचार मंचने आयोजित केलेल्या श्रमदान मोहिमेत मुख्याधिकारी शंकर गोरे, जि.प.सदस्य दीपक पवार, कॉ. किरण माने, ओमकार तपासे, सागर पावशे, प्रशांत आहेरराव आणि मान्यवरांनी सहभाग घेतला.
यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना कॉ. किरण माने यांनी संपूर्ण भारताचा कारभार पाहणार्या छत्रपती शाहूमहाराज यांनी याच जागेतून अनेक मोहिमांचे नियोजन केले. नामांकित सरदार मंडळी शाहूमहाराजांना ज्या सदरेवर मुजरे घालत, त्या सदरेचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी केली. सोबतच खलबतखान्याची माहीती गुरुदास आडगळे यांनी उपस्थितांना दिली. दक्ष विचार मंचने हा कार्यक्रम तडीस लावताना छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीनिमित्त कृतीशील कार्यक्रम आखल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. महेश पवार, प्रकाश भिसे, पद्माकर सोळवंडे, कुणाल पाटोळे यांच्यासह या श्रमदानात शनिवर पेठेतील बाल शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या सुमारे 30 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. 18 मे रोजी सातारा नगरीचे निर्माते छत्रपती शाहूमहाराजांची जयंती तख्ताच्या वाड्यात साजरी केली जाणार असून यानिमित्ताने खलबतखान्यांच्या स्वच्छतेला वेग आला असल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.
उपस्थित छत्रपतीप्रेमींनी सातार्यातील एका मुख्य रस्त्याला छत्रपती संभाजीमहाराजांचे नाव द्यावे तसेच छत्रपती शाहूमहाराजांचा पुतळा बसवण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली. या मागणीवर गोरे यांनी या कामासाठी पालिका नेहमीच सहकार्य करेल, अशी ग्वाही देत शाहू उद्यानातील या जागेचे सुशोभिकरण करण्याचा मागणीला हिरवा कंदील दाखवला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |