06:49pm | Nov 02, 2018 |
वाई : वाई, पाचगणी, महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध बांधकामांच्या विरोधात पर्यावरणप्रेमींना सोबत घेऊन आरपीआय येत्या आठवडाभरात जनआंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दिला असून प्रशासनाने यात हलगर्जीपणा केल्यास भीमसैनिक ही अवैध बांधकामे जमीनदोस्त करतील असाही इशारा पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गायकवाड यांनी म्हटले आहे की, वाई, पाचगणी व महाबळेश्वर हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या परिसरात गेली दहा वर्षांत झपाट्याने होत असलेल्या अवैध बांधकामाकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हिल स्टेशन असलेल्या या परिसरात केंद्र सरकारने कडक निर्बंध लादून इथली जैवविविधता व सौंदर्य जपण्यासाठी कडक कायदा केलेला आहे. मात्र या कायद्याला हरताळ फासून पुण्या-मुंबईच्या धनदांडग्यांनी कवडीमोल किंमतीत जमिनी विकत घेऊन अवैधरित्या जंगलतोड व उत्खनन करून बंगले, फार्महाऊस व हॉटेल्स बांधली आहेत. यासंदर्भात रिपब्लिकन पक्षाने वारंवार ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्यावरणाचे रक्षण करणार्या स्थानिकांना मात्र बांधकामासंदर्भात कडक नियम आणि धनदांडग्यांना सर्व बाबतीत मुभा दिली जात असल्याचे दिसून येते.
इको सेन्सेटिव्ह झोन लागू असताना ही अवैध बांधकामे झालीच कशी? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनाचे या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष का? यासंदर्भात पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करीत आहेत. तळमावले, सिडनी पॉईंट, दांडेघर परिसरात झालेली व सध्या राजरोसपणे अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध बांधकामाकडे जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. धोम धरण परिसरातही मोठ्या प्रमाणात बॅक वॉटरच्या हद्दीत हॉटेल्स व बंगले झाले असून त्यामुळे पर्यावरण व धोम धरणाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिका हद्दीतील हेरिटेज वास्तूही जमीनदोस्त करून त्याठिकाणी अवैध बांधकामे होत आहेत.
याबाबत शनिवार दि. 3 नोव्हेंबर 2018 रोजी महाबळेश्वर येथे होणार्या उच्चस्तरीय सनियंत्रण समितीच्या इको सेन्सेटिव्ह झोन खुल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार असून तात्काळ या सर्व अवैध बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी मी करणार असून या परिसरातील अन्यायग्रस्त नागरिकांनी बैठकीला उपस्थित राहून आरपीआयच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या जनआंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन गायकवाड पत्रकारांशी बोलताना केले.
अवैध बांधकामांमुळे धोम धरण असुरक्षित....
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असलेले प्रसिद्ध धोम धरण परिसरात होत असलेल्या अवैध बांधकामांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अशोक गायकवाड यांनी येथील बांधकामासंदर्भात आंदोलनाची भूमिका घेतल्याने बॅक वॉटर हद्दीत असणार्या धनदांडग्यांच्या बंगल्यावर व हॉटेल्सवर बुलढोझर फिरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता या परिसरात होत असलेल्या अवैध बांधकामांवर कडक कारवाई होणार का? याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |