04:12pm | Jun 04, 2019 |
सातारा : जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणार्या फलटणमधील राजकीय पुढार्यांच्या राजाश्रयामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी बोकाळलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच फलटणमधील एका राजकीय पुढार्याच्या गाडीवर चालक असणार्याच्या मुलाने फलटण येथील प्रथितयश व्यापार्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याला गंभीर जखमी करुन त्याच्या जवळील रोख रक्कम लांबविण्याचा प्रयत्न केला होता. परंतू सुदैवाने जागरुक लोकांमुळे ‘त्या’ चालकाचा मुलगा जागेवरच लोकांच्या हाती सापडला होता. दरम्यान, काही वर्षांपासून तत्कालीन पोलीस अधिकार्यांच्या दट्ट्यामुळे फलटणमधील लुप्त झालेली गुन्हेगारी पुन्हा एकदा बोकाळू पाहत आहे.
अवैध खासगी सावकारी, मटका, जुगार, गोवंश मांसाची (बिफ) तस्करी, गुंडगिरीमुळे फलटणचे नाव सातारा सह राज्यभरात बदनाम झाले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, संदीप पाटील या दबंग अधिकार्यांनी फलटणमधील गुन्हेगारी कोणतीही राजकीय हस्तक्षेपाची भीडभाड न ठेवता मोडून काढली होती. फलटणमधील गुन्हेगारीला असलेल्या राजाश्रयामुळेच फलटणमधील गुन्हेगारी बोकाळलेली होती. परंतू वरील दोन अधिकार्यांनी कोणत्याही महाराजाचा मुलाहिजा न ठेवता व्हाईट कॉलर गुंडगिरी मोडित काढली. त्यामुळेच फलटणमधील गुंडगिरी नेस्तनाबूत झाली होती. परंतू फलटणमधील भ्रष्ट पोलिसिंगमुळे व राजकीय पुढार्यांच्या राजाश्रयामुळे गुंडगिरी पुन्हा एकदा बोकाळल्याचे चित्र दोन दिवसांपूर्वीच झालेल्या घटनेमुळे समोर आलेले आहे.
प्रीतम गांधी रा. सिटी बझार समोर, लक्ष्मीनगर, फलटण यांचे अरविंद क्लॉथ हे कपड्याचे दुकान असून परवा रात्री साडेनऊ वाजता ते दुकान बंद करुन घरी जात असताना दबा धरुन बसलेल्या तिघांनी त्यांची पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रीतम गांधी यांचा मुलगा पार्श्व याने पळत येवून आरडाओरडा करीत विरोध केल्यामुळे त्या संशयित लुटारुंपैकी एकाने आपल्याजवळील चाकू प्रीतम गांधी यांच्या पाठीत खुपसला. परंतू प्रीतम यांचा मुलगा पार्श्व याने एका आरोपीला पकडून ठेवले. तसेच जमलेल्या लोकांनी पकडलेला संशयित अनिकेत नरेंद्र कदम (वय 19) रा. सगुणामाता नगर, मलठण याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अनिकेत कदम हा फलटणमधील एका राजकीय पुढार्याच्या गाडीवरील चालकाचा मुलगा आहे. त्यामुळे आता वेगळे काही सांगण्याची गरज उरली नाहीये.
सुमारे दहा वर्षापूर्वी गुंदेचा नावाच्या व्यापार्याला लुटण्यात आले होते. त्या घटनेचे पडसाद उमटून फलटणमध्ये जातीय दंगल निर्माण झाली होती. त्यामुळे सातारा पोलिसांना काही दिवस त्यावेळी कर्फ्यू लावावा लागला होता. फलटणमधील गुन्हेगारी पोलिसांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेली आहे. फलटणमधील राजकीय पुढारी अवैध खासगी सावकार व गुंडापुंडांना पदरी ठेवत असल्यामुळेच फलटणमधील गुन्हेगारीत वाढ होत आहे. मात्र फलटणमधील काही ‘महाराज’ तो मी नव्हेच अशा अविर्भावात जिल्ह्यात राजकारण करतात. मात्र, दिव्याखाली अंधार असल्यामुळे त्यांना खालचे काही दिसत असूनही ते दिसत नसल्यासारखे वागतात. काही वर्षांपूर्वी फलटणमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा फार्स करण्यात आला होता. लाखो रुपये गोळा करुन ही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली होती, मात्र या निकृष्ट दर्जाच्या सीसीटीव्हीचा पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासात काहीच उपयोग होत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच व्यापार्यांकडून लाखो रुपये गोळा करुन बसविण्यात आलेली ही यंत्रणाच संशयाच्या भोवर्यात आलेली आहे. सीसीटीव्ही बसविल्यानंतर फलटणमधील गुन्हेगारी कारवाया काही दिवस थंडावल्या होत्या. मात्र, सीसीटीव्ही यंत्रणाच कुचकामी असल्याचे गुन्हेगारांच्या निदर्शनास आल्यानंतर फलटणमध्ये काही दिवसांमध्येच गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. फलटणमध्ये परवा घडलेल्या रॉबरीमुळे फलटणमधील व्यापार्यांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फलटणमधील एका राजकीय पुढार्याच्या गाडीवरील चालकाच्या मुलाने केलेल्या या कृष्णकृत्यामुळे फलटणमधील गुन्हेगारीला कोणाची फूस आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ झालेले आहे. सीसीटीव्हीचा फार्स करुन लाखो रुपये गोळा करणार्यांची चौकशी करण्याची मागणी फलटणमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे.
मॅडमजी, हे दिसतात एवढे सरळ नाहीत !
फलटणमधील गुन्हेगारी ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेली होती. राजकीय पुढार्यांनी आपल्या फायद्यासाठी फलटणमधील गुंडपूंड पोसलेले होते. परंतू तत्कालीन पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील यांनी फलटण नरेश व त्यांच्या पिलावळींना ठेचून फलटणमधील व्हाईट कॉलर गुंडगिरी मोडित काढली होती. फलटणमधील गुन्हेगारी कारवाया थांबल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतू फलटणमधील एका राजकीय पुढार्याच्या गाडीवरील चालकाच्या मुलाने घडवून आणलेल्या रॉबरीमुळे फलटण तालुक्यातील गुन्हेगारांना कोणाचे पाठबळ आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एस.पी. मॅडमजी, फलटण नरेश दिसतात एवढे निश्चितच ‘सरळ’ नाहीत. त्यांच्या बगलबच्च्यांना पुन्हा एकदा ठेचले तरच फलटणमधील जनता सुरक्षित राहणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |