पाटण (सातारा) : दारुच्या नशेत भरधाव चारचाकीने रस्त्याशेजारी वाढदिवसाचा फ्लेक्स लावत असलेल्या पाचजणांना उडविले आहे. अडुळपेठ (ता. पाटण) येथे रात्री ११ वाजता ही घटना घडली असुन एकाचा मृत्यु, एकजण गंभीर व तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. साहिल दिनकर निवडुंगे असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, एका मित्राच्या वाढदिवसाचा फ्लेक्स कराड-चिपळुण महामार्गालगत २० फुट अंतरावर अडुळपेठ येथे २० ते २५ जण रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान लावत होते. त्यावेळी नवारस्त्याहुन पाटणकडे येणाऱ्या चारचाकी तवेरा गाडीचालकाने दारुच्या नशेत या तरुणांच्या आंगावर गाडी घातली. यामध्ये पाचजण जखमी झाले.
जखमींना तात्काळ कृष्णा रुग्णालय कराड येथे उपचारासाठी दाखल केले. त्यामध्ये साहिल दिनकर निवडुंगे (वय १९) याचा रात्री उपचारा दरम्यान मृत्यु झाला. जखमी इतर चार पैकी महेश दत्तात्रय शिर्के (वय १९) गंभीर जखमी झालेला आहे. रविंद्र शिवाजी नलवडे (वय २०), गणेश रामचंद्र शिर्के (वय १८) व किशोर दत्तात्रय शिर्के (वय १८) हे किरकोळ जखमी झाले असुन त्यांच्यावरही उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची नोंद पाटण पोलिसात अजुन झाली नसुन अडुळ गावावर शोककळा पसरली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |