04:49pm | May 17, 2018 |
सातारा : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना त्यांच्या प्रशासनिक कामाची दखल घेवून काल मुंबई येथील कार्यक्रमात नव भारत ग्रुपकडून " आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन " या सन्मानाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती अमृता फडणवीस व राज्याच्या महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर उपस्थिती होत्या. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सातारा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यापासून जयलुक्त शिवार अभियानात विशेष लक्ष दिले आहे. आज त्यांच्यामुळे कायम टंचाईग्रस्त असणारा माण व खटाव तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चांगली कामे झाली असून गावे पाण्याने स्वंयवूपर्ण होऊन टँकरच्या संख्येत घट झाली आहे. जिल्ह्यात मुलांच्या जन्मदरात पुरुषांच्या संख्येबरोबर महिला जन्मदाराचा टक्का कमी आहे, हा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाच्या मदतीने मोठे प्रयत्न करण्यात येत आहे.
सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेले अनेक वर्षे प्रलंबीत असणारे धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याचे उत्तम उदाहरण उरमोडी धरणाचे राज्यातील आदर्श पुनर्वसन आहे. या सर्व कामांची व कामगार विभागाच्या उपसचिव म्हणून केलेले काम व रेशनिंग विभागात असताना केलेले काम याची दखल घेवून कर्तबगार स्त्रियांमध्ये सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची निवड करण्यात आली. त्या पुरस्काराचे काल भव्य कार्यक्रमात मुंबईत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना गौरविण्यात आले.
नवभारत ग्रुपकडून 24 विविध क्षेत्रात उललेखनीय काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यातील प्रशसकीय सेवा या विभागातला पुरस्कार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना देण्यात आला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |