RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

IPL 2019 : विजयासह मुंबई अव्वल, आता आव्हान चेन्नईचे

06 May 2019 at 16:10

मुंबईचा पहिल्या क्वालिफायरमध्ये सामना होणार आहे तो चेन्नई सुपर किंग्सबरोबर.

मुंबई : कोलाकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवत मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता मुंबईचा पहिल्या क्वालिफायरमध्ये सामना होणार आहे तो चेन्नई सुपर किंग्सबरोबर. मुंबईने या सामन्यात कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले.

कोलकाता पराभूत झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे. हैदराबादला आता दिल्ली कॅपिटल्सचा सामना एलिमिनेटरमध्ये करावा लागणार आहे.

कोलकाताच्या 134 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी 46 धावांची सलामी दिली. डीकॉक यावेळी 30 धावा केल्या. डीकॉक बाद झाल्यावर रोहित आणि सूर्यकुमार यादव (नाबाद 46) यांनी अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितने यावेळी 48 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या.

मुंबईने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. कोलकाताचा सलामीवीर ख्रिस लिनने झोकात सुरुवात केली. पण हार्दिक पंड्याने मात्र ख्रिस लिन आणि शुभमन गिल या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. हे दोन धक्के बसल्यावर कोलकाताचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. आंद्रे रसेलला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार दिनेश कार्तिकलाही फक्त तीन धावांवर समाधान मानावे लागले.

कोलकात्याच्या तेराव्या षटकामध्ये रसेल फलंदाजीला आला, पण पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. मलिंगाने वेगाने एक चेंडू रसेलच्या बॅटजवळून टाकला. हा चेंडू रसेलच्या बॅटला लागून थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. यष्टीरक्षक क्विंटर डीकॉकने कोणतीही चूक न करता हा झेल टिपला. त्यामुळे रसेलला पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतावे लागले.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सला 133 धावांवर समाधान मानावे लागले. मुंबईकडून लसिथ मलिंगाने तीन आणि हार्दिक पंड्याने दोन फलंदाजांना बाद केले.