कराड : विजय दिवस समारोहातुन प्रेरणा घेवुन देशसेवेसाठी सैन्यदलात जवान भरती होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र वरिष्ठ दर्जाचे अधिकारी घडणे आवश्यक आहे. त्यासाठी विजय दिवस समितीने सुरु केलेले काम देशांसाठी प्रेरणादायी आहे. विजय दिवस आता कर्हाडकरांचा झाला आहे याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
विजय दिवस समारोह समितीच्यावतीने भारतीय सैन्यदलात अधिकारीपदावर रुजु झालेले हर्षवर्धन मोहिते, सांस्कृतीक कार्याबद्दल मिनल ढापरे यांचा तर खेळाडु केदार साळुंखे, आदर्श विद्यार्थीनी सबाह सय्यद आणि विजय दिवस समीतीच्यावतीने आयोजीत गणराया अॅवार्डचेही पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, विजय दिवसचे प्रवर्तक निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील, सौ. संध्या पाटील, अॅड. संभाजीराव मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, कर्नल संभाजीराव पाटील त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने गेल्या सलग 20 वर्षापासुन विजय दिवस समारोह साजरा केला जातो. त्यातुन अनेक तरुण प्रेरणा घेवुन सैन्यदलात भरती होत आहेत. सैन्यदलात वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी घडणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्नल पाटील यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यश यावे यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. विजय दिवस हा आता सर्व कर्हाडकरांचा झाला आहे ही समाधानाची बाब आहे.
निवृत्त कर्नल पाटील म्हणाले, भारतीय सैन्यदलाने बांग्लामुक्ती संग्रामात विजय मिळवला. त्या कारवाईत मीही होतो. त्यामुळे त्याचा एक भाग म्हणुन कर्हाडमध्ये 16 डिसेंबरला विजय दिवस समारोह साजरा केला जातो. भारत व महाराष्ट्र शासनासह सर्वांचे सहकार्य त्याला लाभत आहे. अॅड. मोहिते यांनी प्रास्ताविक केले. विनायक विभुते यांनी आभार मानले.महेंद्र भोसले यांनी सुत्रसंचालन केले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |