सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मंगळवारी सातारा जिल्हा न्यायालयात त्यांना हजर केले असता 10 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याचप्रकरणी महाबळेश्वरच्या गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी पसार असून एसीबी विभाग त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पुनीता गुरव यांना जामीन न होता पोलिस कोठडी मिळाल्याने या साखळीमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सातारा लाचलुचपत प्रतिबंध तथा एसीबीने सोमवारी सांयकाळी प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे.वेतनश्रेणी फरक बिल काढून तो मंजूर करण्यासाठी तक्रारदार शिक्षकाकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुुरव व गट शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना भेटले असता दोघांनी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार शिक्षकाने सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली. लाचेची रक्कम सोमवारी स्वीकारणार असल्याचे ठरल्यानंतर सातारा एसीबीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सापळचा रचला. सोमवारी सांयकाळी पुनीता गुरव यांनी शिक्षण विभागाच्या त्यांच्या केबिनमध्ये लाचेचे दहा हजार रुपये स्वीकरल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ त्यांना ताब्यात घेवून अटक केली. प्राथमिक शिक्षणाधिकारीच सापडल्याने सातारा जिल्ह्यासह शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सोमवारी एसीबीच्या पथकाने पुनीता गुरव यांना अटक केल्यानंतर वंदना वळवी यांना अटक करण्यासाठी पोलिस गेले. मात्र वळवी पसार झाल्या असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मंगळवारी दुपारी पुनीता गुरव यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. वंदना वळवी पसार झाल्याने व अन्य चौकशी करायची असल्याने त्या आधारावर पोलिस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आरिफा मुल्ला करत आहेत.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |