कराड : माथाडींचे आराध्य दैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या धर्मपत्नी व माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांचे गुरुवार दि.२५ एप्रिल,२०१९ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ६५व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्याच्या पाश्चात दोन मुली,तीन मुलगे नातवंडे असा परिवार आहे. माथाडी कामगार चळवळ उभी करताना वत्सलाताई पाटील यांनी स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांना मोलाची साथ दिली होती. स्व.आमदार अण्णासाहेबांच्या निधनानंतर माथाडी कामगार चळवळ पुढे नेह्ण्यासाठी त्यांनी खंबीरपणे माथाडी नेत्यांना साथ दिली. अखेरच्या श्वासापर्यंत माथाडी चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. स्व.अण्णासाहेब पाटील यांचे कार्य पुढे नेह्ण्यासाठी त्या नेहमीच पुढे येवून कार्यात सहभागी होत होत्या. स्व.आ.अण्णासाहेब पाटील यांच्या आकस्मित निधनानंतर कुटुंबियातील सर्वांना त्यांनी मातोश्री व पिताश्रीच्या भूमिकेत राहून येणा-या प्रत्येक परिस्थितीवर मात करण्यासाठी पाठबळ दिले. वत्सलाताई अण्णासाहेब पाटील या माथाडी कामगार चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत होत्या त्यामुळे त्यांच्याबद्दल कामगारांमध्ये एक वेगळी आस्था होती त्यांच्या निधनामुळे कामगार वर्गामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या धर्मपत्नी वत्सलाताई पाटील यांनी माथाडी कामगार चळवळीत भाग घेण्याबरोबर मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांच्या पश्चात डॉ.हणमंतराव पाटील,माथाडी हॉस्पीटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तर नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे संघटनेचे नेते व सरचिटणीस आणि माजी आमदार व मंत्री आहेत, तसेच रमेश अण्णासाहेब पाटील हे माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक व सातारा जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कन्या अॅड. भारतीताई पाटील या नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत.
वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांचे पार्थिव शुक्रवार दि.२६ एप्रिल,२०१९ रोजी सकाळी ९:०० वाजता माथाडी भवन,तुर्भे,नवीमुंबई येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |