07:52pm | Apr 16, 2018 |
सातारा : काल दि. 15 एप्रिल रोजी येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय सर्वसाधारण रुग्णालयात लिफ्टमध्ये बालकासह त्याचे पालक लिफ्टमध्ये तब्बल दोन तास अडकले होते. यानंतर झालेल्या अथक प्रयत्नानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून संबंधितांना बाहेर काढण्यात आले.
सातारा शहरातील नागरी वस्त्यांचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. सातारा शहरासह उपनगरांमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. तीन मजल्यांपासून सहा ते सात मजल्यांपर्यंत इमारतीची उंची वाढलेली आहे. असे असताना वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी लिफ्टची आवश्यकता भासणे क्रमप्राप्त आहे. त्या-त्या आवश्यकतेनुसार इमारतींना विकासकांनी लिफ्ट बसविलेल्या आहेत. मात्र या लिफ्ट कालबाह्य व निकृष्ट दर्जाच्या असल्याने अनेक छोटे-मोठे अपघात दररोज घडत असतात. त्यातच सातार्यातील लाईट जाण्याची कोणतीही एक ठराविक वेळ नाही. त्यामुळे या अपघातांची भीती जनमानसात जास्त आहे. एकदा इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले की विकासक पुन्हा त्या इमारतीकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे लिफ्टची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अनेक इमारतींमधील लिफ्ट बंद अवस्थेमध्ये आहेत. ज्या चालू आहेत, त्या कोणत्याही क्षणी बंद पडू शकतात. काल घडलेले क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील प्रकारही त्यातलाच होता. पोवई नाक्यावरील गुलबहार या हॉटेल कम स्पोर्टस् बार मधील लिफ्टमध्ये गेल्या आठवड्यात सुमारे सहा ते सात युवक अडकून पडले होते. निकृष्ट दर्जाच्या लिफ्टमध्ये वातानुकूलित यंत्रणा न बसविल्यामुळे ते युवक अक्षरश: गुदमरुन गेले होते. सुमारे अर्ध्या तासानंतर अथम प्रयत्न करुनही लिफ्ट न उघडल्यामुळे लिफ्टमधील युवकांनीच लिफ्टचा दरवाजा वाकवून आपले प्राण वाचवले. याबाबत हॉटेल प्रशासनाला जाब विचारला असता हॉटेल प्रशासनाने यातून हात झटकण्याचा प्रयत्न केला.
सातारा शहरासह जिल्ह्यात अनेकदा लिफ्टमुळे अनेक लोक जखमी होतात. परंतू प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची दखल अद्यापपर्यंत घेतलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्कालीन यंत्रणा अस्तित्वात आहे. परंतू त्यांचे अस्तित्व फक्त पावसाळ्यातच नागरिकांना जाणवते. इतरवेळी ही यंत्रणा नक्की काय करते, याबाबत खुलासा करणे गरजेचे आहे. अनेक बिल्डर बिल्डिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर निकृष्ट दर्जाच्या लिफ्टबाबत जबाबदारी घेण्याचे टाळतात. तसेच इमारतीतील रहिवासीही याबाबत सजग नसतात. त्यामुळे लिफ्टचे नक्की करायचे काय, या प्रश्नामध्ये ते गुरफटलेले असतात. आज करु, उद्या करु अशी चालढकल केल्यामुळे भविष्यामध्ये लिफ्टचा मोठा अपघात होवू शकतो. त्यामुळे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रांत शिर्के व समीरराजे घाडगे यांनी केली आहे.
" सरकारी तसेच खाजगी अस्थापनातील त्यांच्या कार्यालयात असणार्या लिफ्टबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात असणार्या यंत्रणांना माहिती देणे बंधनकारक आहे. जुन्या, तकलादू, नादुरुस्त असणार्या लिफ्टबाबत आपत्कालीन विभागाच्या अधिकार्यांना माहिती घेण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत लवकरच बैठक आयोजित करणार असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी एस. एन. गायकवाड यांनी सातारा टुडे शी बोलताना दिली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |