कराड : आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रातील तमाम महिला व युवतींचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे. महिलांचा अवमान करत त्यांनी एक प्रकारे विनयभंग केला असून, विनयभंग केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कराडमध्ये (जि. सातारा) लोकशाही आघाडीकडून करण्यात आली आहे.
कराडमध्ये गुरुवारी दुपारी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार्या लोकशाही आघाडीने निवासी नायब तहसीलदार अजित कुर्हाडे यांना निवेदन दिले. या निवेदनात आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. अत्यंत किळसवाणी व महिलांना तुच्छतेने वागणूक देणारी त्यांची मानसिकता असून बेजबाबदार वक्तव्य करीत आमदार कदम यांनी एक प्रकारे महिलांचा विनयभंग केला आहे. अनेक महिला युवतींना एकतर्फी प्रेमाला बळी पडावे लागते. त्यातून अनेक धक्कादायक घटना घडतात. त्यामुळे आमदार राम कदम यांच्यासारख्या जबाबदार माणसाने युवा पिढीला चांगले आचार विचार देणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात उलट घडत असून, ते आमदार म्हणून काम करण्यास लायक नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करून विनयभंगाची तक्रार नोंदवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
माजी नगरसेविका अरुणा जाधव, विद्यमान नगरसेविका अनिता पवार, पल्लवी पवार, सुनंदा शिंदे, माजी नगरसेविका पुनम रसाळ, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांच्या पत्नी डॉक्टर गौरवी पाटील, माजी नगरसेविका ज्योती बेडेकर, नगरसेवक वैभव हिंगमिरे, माजी नगरसेवक सुहास पवार, अख्तर आंबेकरी, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार बटाणे, शिवाजी पवार, जयप्रकाश रसाळ यांच्यासह लोकशाही आघाडीचे आजी -माजी पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |