04:50pm | Apr 08, 2020 |
न्यूयॉर्क : संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेला कोरोना विषाणू संसर्गने संपूर्ण अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये अनेक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क मधील भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यामुळे स्थानिक पत्रकारांमध्ये सन्नाटा पसरला आहे. भारतीय प्रसार माध्यमांनीही त्याची नोंद घेऊन काळजी घ्यावी, अशी अनेकांनी सूचना केली.
भारत-अमेरिका यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण करण्यात ब्रह्म कांचीबोटला यांचेही कौशल्य होते. भारतीय म्हणून त्यांना खूप मोठा अभिमान होता. दरम्यान, त्यांच्या निधनाची बातमी मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांच्या निधनाची माहिती मिळाल्यावर दुःख झाले. भारत आणि अमेरिकेमधील संबंध चांगले निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते कायम स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबत माझी सहानुभूती आहे. "ओम शांती.." अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.
माध्यमांच्या अहवालानुसार अधिक माहिती अशी की, मार्चच्या पहिल्या आठवड्यात पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांना कोरोना विषाणू लागण झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने नऊ दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ब्रह्म कांचीबोटला हे युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे माजी सहकारी होते.
न्यूयॉर्कमध्ये आत्तापर्यंत ३८ हजार पेक्षा अधिक लोकांना कोरोना ची लागण झाली आहे. तर पाच हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिका सारख्या प्रगत देशानेसुध्दा भारत देशाला हायड्रोक्सिक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |