कराड : नवरात्रोत्सव व दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांशी संबंधीत कराड तालुक्यातील सुमारे साठ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीची पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी दिली.
नवरात्रोत्सव व विजया दशमी अर्थात दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कराड ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. त्याअंतर्गंत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना पोलिसांनी राबवल्या आहेत. दसऱ्यानंतर अवैध दारू विक्रीला उधाण येणार असल्याचे तसेच मटका-जुगार अड्ड्यांची चलती लक्षात घेवन्ूा कराड ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील ६0 हून अधिक जणांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव पोलीस उपअधिक्षकांकडे पाठवले होते. त्यावर संबंधिताचे म्हणणे ऐकून घेवून पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी तब्बल ६0 जणांना दि. १९ ते २१ या कालावधीत तीन दिवसांसाठी तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. अवैध दारू विक्रीला व मटका-जुगार अड्ड्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. पोलीस उपअधिक्षकांनी दिलेल्या हद्दपारीच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही पो. नि. क्षीरसागर यांनी सांगितले.
तालुक्यातील चारशे मुर्तींचे विसर्जन होणार
कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभरावर गावांत तब्बल ४00 दुर्गामाता देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. या ठिकाणी उत्सव काळात विविध उपक्रम व दांडिया सुरू आहे. संबंधितांना उत्सव काळात व मिरवणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याबाबत लेखी नोटीसा व तोंडी सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. दसऱ्याच्या मिरवणूकांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे. तालुक्यातील ४00 मूर्तींचे विसर्जन दसऱ्या दिवशी होणार असल्याने काले, ओंड, उंडाळे, येळगाव, वाठार, रेठरे, शेरे-शेणोली स्टेशन, वडगाव हवेली, कोपर्डे हवेली आदी गावांच्या मार्गावर पोलिसांची फिरती गस्तपथके बंदोबस्तावर राहतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |