01:32am | Aug 26, 2018 |
कराड : नगरपालिकेने मुळच्या मिळकत कर आकरणी संदर्भात केलेली मिळकत मोजमापे, मुल्यांकन आदी काम मे. कोअर प्रोजेक्ट कन्सटंट, अमरावती या कंपनीला देण्यात आले आहे. या कामात कंपनीकडून आकडेमोड करता अनेक त्रुटी राहिल्या आहेत. या त्रुटी दुरूस्त करण्याची नोटीस पालिकेने कंपनीला बजावली आहे. त्यामुळे मिळकतदारांनी वाढीव कर जुन्या बिलाप्रमाणेच भरावा, असे आवाहन जनशक्ती आघाडीच्यावतीने उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, दि. ३१ ऑगस्टच्या जनरल सभेत सुधारित बिले कार्यवाहीस मंजूरी घेण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीत कराड पालिकेची चतुर्थ वार्षिक कर आकारणी निश्चित करण्यात आली आहे. या आकारणीमध्ये कायदेशीर तरतुदीनंतर सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यानुसार मुळ कर आकरणी दरामध्ये २० टक्के वाढ जनरल कमेठी ठराव क्र. १/२६ ने दि. २७ मे २०१६ रोजी केला असून तो नगररचना विभाग, सातारा यांना कळवला आहे. त्यानुसार २०१८-१९ मध्ये मिळकत कराची बिले मुळ बिलाच्या सर्वसाधारण २० टक्के पर्यंतच वाढणे अपेक्षित होते. याकरिता पालिकेने कर मिळकतींची मोजमापे मुल्यांकन आदी बाबी निश्चित करण्यासाठीचे काम मे. कोअर प्रोजेक्ट कन्सलटंट, अमरावती या कंपनीला दिले आहे.
मात्र, वाटप करण्यात आलेल्या बिलांमध्ये त्रुटी राहिल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात आली. यात सदरच्या कंपनीकडून आकडेमोड करताना चुका झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. झालेल्या चुका दुरूस्त करण्याची सूचना कंपनीला केली आहे. कंपनीकडून दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले असून त्यामुळे मिळकतदारांनी मागील बिलाप्रमाणे कर भरावा. कर आकारणी रहिवाशी व वाणिज्य वापर असणाऱ्या मिळकतींना केली जाते. त्यामुळे शहरातील जनावरांच्या गोट्यांना आकारणी केली जाणार नाही. अशी बिले नागरिकांना आली असल्यास ती भरू नयेत. तसेच ज्यांनी अपिल केले आहे, त्यांनी सुनावणीच्या तारखेस येण्याची गरज नाही. बिल सुधारणापूर्ण झाल्यानंतर दुरूस्त संकलित कराची बिले नागरिकांना देण्यात येणार आहेत. तसेच दि. ३१ ऑगस्टच्या जनरल सभेत या सर्व करावयाच्या कारवाहीस मंजूरी दिली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |