सातारा : सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणार्या चौघांच्या टोळीला पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तडीपार केले. संशयित सर्व युवक रुईघर ता.जावली येथील असून ते तिशीतले आहेत. दरम्यान, त्यांच्यावरील कारवाईने चोरट्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अविनाश चंद्रकांत गोळे (वय 23), किरण चंद्रकांत बेलोशे (वय 25), किशोर शामराव निकम (वय 26), गणेश जनार्दन बेलोशे (वय 22, सर्व रा.रुईघर ता.जावली) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. यातील अविनाश गोळे हा टोळी प्रमुख आहेे. संशयितांनी त्यांची टोळी तयार करुन घरफोड्या करण्याचे सत्र राबवले होते. पोलिसांनी तपास करुन संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती. संशयितांच्या या कृत्यामुळे समाजात भितीचे वातावरण होते. त्यांच्याकडून भविष्यात हिंसक घटना घडण्याची भिती होती. तसेच चारही संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती.
मेढा पोलिसांनी संशयित चारही युवकांचा प्रस्ताव तयार करुन तो पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवला. त्याबाबत सुनावणी झाल्यानंतर अखेर चौघांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश काढण्यात आले. तत्काळ या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात अशाप्रकारे घरफोड्या करणार्यांसह अनेक गुंड पोलिसांच्या रडारवर असून येत्या काही दिवसांमध्ये आणखी तडीपारीच्या कारवाई होण्याची शक्यता आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |