RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना एकाचा मृत्यू

12 June 2019 at 01:46

काही काळ तणावाचे वातावरण; सखोल चौकशीचे आश्‍वासन

सातारा : किरण शरद भिसे (वय 32, रा.सदरबझार, सातारा) यांचा मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. दरम्यान, वैद्यकीय अधिकार्‍यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यामुळे सिव्हीलमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर जिल्हा शल्यचिकित्सक अमोल गडीकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

याबाबत अधिक माहिती अशी, की किरण भिसे हे पोवई नाक्यावरील एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने ते उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मात्र काही वेळातच उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली.

प्राथमिक माहिती घेतल्यानंतर यावेळी नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकारी हे उपचार सोडून व्हाट्सअपवर गुंग होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच किरण भिसे याचा मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. याबाबतची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि प्रदीपकुमार जाधव हे पोलीस फौज फाट्यासह जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी भिसे कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक डॉक्टरांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीवर ठाम राहिले. जिल्हा शल्यचिकित्सक अमोल गडीकर यांच्या दालनात किरण भिसे यांच्या नातेवाईकांची बैठक झाली. घडलेल्या प्रकरणाची गांभीर्याने व सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीमध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे डॉ.गडीकर यांनी सांगितल्यानंतर किरण भिसे यांचे नातेवाईक शांत झाले. दरम्यान, सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

नंदगिरी महाराजांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा सोळशी ग्रामस्थांकडून निषेध

सोळशी, ता. कोरेगाव येथील शनी देवस्थानच्या नंदगिरी महाराजांवर सोळशी येथील काही लोकांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. नंदगिरी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून सोळशी येथील शनी देवस्थानमध्ये लोकांची सेवा करीत आहेत. अशा व्यक्तीवर पूर्वग्रहदूषित

1 hour before

श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी. पाटील यांची पुण्यतिथी साजरी

येथील श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी.पाटील यांचा 11 वा पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

14 hours before

मलकापूरच्या मतदार यादीत बोगस नावे

मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापूर शहरात मतदार यादीमध्ये ऑनलाईन दाखल अर्जांची पडताळणी न करता बोगस नावांचा समावेश झाला आहे. बीएलओंकडून पडताळणी व प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी न झालेली

14 hours before

असंघटीत कामगार मेळावा हा कष्टकर्‍यांना बळ देणारा : सुदर्शन पाटसकर

युवा विकास प्रतिष्ठान कराड व भाजपा युवा मोर्चा तर्फे असंघटीत कामगार मेळाव्याचे आयोजन बाबुभाई पद्मसी शहा हॉल विठ्ठल चौक कराड येथे नुकतेच करण्यात आले. सदर मेळाव्यास मोहन जाधव संचालक पुणे म्हाडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते.

14 hours before