कराड : प्रवाशांच्या सेवेसाठी सुसज्ज आणि सर्व सोईनियुक्त अत्याधुनिक बसस्थानक शासनाच्या निधीतून कराडमध्ये बांधण्यात आले आहे. हे बसस्थानक कराडच्या वैभवात आणखीन भर घालेल तसेच प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्रात 98 बसस्थानकांचे काम सुरु आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दिली.
स्व.यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त बांधण्यात आलेल्या कराड येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कराड येथील नूतन बसस्थानकाचे उद्घाटन आज परिवहन मंत्री श्री. रावते यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक राहूल तोरे, कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी राज्यातील 113 ठिकाणांच्या बसस्थानकांना संरक्षण भिंती बांधण्यात येणार असल्याचे सांगून परिवहन मंत्री श्री. रावते पुढे म्हणाले, 85 प्रवास गृहांचे नुतनीकरण करण्यात येत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अधिकारी, कर्मचार्यांसाठी सर्व सुविधा असणारे विश्रामगृहासाठी प्रयत्न असणार आहेत. यापुढे महामंडळातील कर्मचार्यांना शिक्षणासाठी बँकेचे कर्ज घ्यावे लागणार नाही, बीन व्याजी पैसे आता महामंडळ देणार आहे. महामंडळातील कर्मचार्यांची मुले महाविद्यालयात शिकत आहेत अशा मुलांच्या खात्यात दर महिन्याला थेट 750 रुपये जमा करण्यात येत आहेत. कर्मचार्यांच्या मागण्यानुसार बदलण्यात करण्यात येत आहेत. अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत शालेय मुलींना प्रवासासाठी मोफत पास महामंडळाकडून देण्यात येत आहे. कराडच्या नूतन बसस्थानकाच्या आणखीन विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही परिवहन मंत्री श्री. रावते यांनी शेवटी सांगितले.
आजही सर्वसामान्य जनतेचा एसटी महामंडळावर विश्वास आहे. प्रवाशांना देण्यात येणार्या सुविधांमध्ये वाढ करावी. शासनाने शिवशाही बस सेवा उपलब्ध करुन दिली हा एक चांगला निणर्य आहे. कराडसारखे सुसज्ज असे बसस्थानक सातारा येथे व्हावे, अशी इच्छा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण जन्म शताब्दीनिमित्त कराडच्या बसस्थानकासाठी निधी देण्यात आला होता. या निधीतून सर्वसुविधांयुक्त अशी वास्तू तयार झाली आहे. या बसस्थानकात प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली ही वास्तु कराडचे वैभव वाढवणारी आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
सर्वसामान्यांना घरापर्यंत, गावापर्यंत पोहचविण्याचे काम एसटी करते. मोठे-लहान, उद्योग, शिक्षणाच्या सर्व सुविधा असणारे कराड शहर आहे. यात्रा कालावधीत या बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते अशा वेळी गाड्यांच्या फेर्या वाढवाव्यात. कराडमध्ये नवीन चांगले बनस्थानक झाले आहे आता अधिकारी, कर्मचार्यांनी नव्या उमेदेने प्रवाशांना सेवा द्या, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळीकेले.
यावेळी आमदार आनंदराव पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास राज्य मार्ग परिवहन मंडळातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |